Moscow-Goa : अखेर 'ती' फ्लाईट दाबोळी विमानतळावर पोहोचली

विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर जामनगरमध्ये इर्मजन्सी लॅन्डिंग करण्यात आले
Azurair
AzurairDainik Gomantak

Moscow-Goa : मॉस्कोहून दाबोळी विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असलेल्या रशियन चार्टर विमानात बॉम्ब असल्याची माहिती सोमवारी रात्री उशिरा गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाली होती. यानंतर 244 प्रवाशी असलेले हे विमान तातडीने जामनगर-गुजरात विमानतळाकडे वळवण्यात आले. तिथे रात्री 9.49 वाजता विमानाचे सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आले. त्यानंतर तब्बल 6 तास याबाबत तपास करण्यात आला. मात्र तपासानंतर काहीच न आढळल्याने जामनगरला उतरलेली फ्लाईट गोव्याकडे वळवण्यात आली. अखेर मॉस्को-गोवा विमानाने दुपारी गोव्यात लॅन्ड केले आहे.

Azurair
Moscow-Goa फ्लाईटमधील प्रवाशांचे हाल, विमानतळावरील व्हिडिओ आला समोर

मिळालेल्या माहितीनुसार, मॉस्कोहून गोव्याला उड्डाण करणारे रशियन हवाई कंपनी अझूर एअरच्या विमानात स्फोटक बॉम्ब असल्याचा एक फोन पोलिसांना आला. त्याचवेळी गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोललाही याच आशयाचा एक मेल प्राप्त झाला. यानंतर हायअलर्ट जारी करून विमानाच्या पायलटला सूचित करण्यात आले. यानंतर विमान तातडीने जामनगर-गुजरात विमानतळाकडे वळवण्यात आले. तिथे रात्री 9.49 वाजता विमानाचे सुरक्षित लॅन्डिंग करण्यात आले. त्यानंतर विमान आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र तपासानंतर काहीच न आढळल्याने विमान गोव्यातील दाबोळी विमानतळाकडे वळविण्यात आले. अखेर मंगळवारी दुपारी मॉस्को-गोवा विमान दाबोळी विमानतळावर लॅन्ड करण्यात आले.

Azurair
Kadamba Bus Service : मोपा-मडगाव कदंब बसचे दर थोडे महागच

या घटनेमुळे दाबोळी विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल नेमका कुठून आला? कुणी केला याची चौकशी केली जात आहे. रात्री उशिरा पोलिसांची उच्च बैठक सुरू झाली होती. बॉम्बची माहिती मिळताच दाबोळी विमानतळावर बॉम्बशोधक पथक तसेच अग्निशमन दलाचे पथक तत्काळ पोहोचले. याशिवाय सीआयएसएफचे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक देखील हजर झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com