Accident News Dainik Gomantak
गोवा

Sanquelim Accident: उलट दिशेने गाडी घालून दुचाकीला उडवले, ग्रामस्थांनी अडवली कार; अल्पवयीन चालकासह चौघांना अटक

Sanquelim Hit And Run Case: डिचोली पोलिसांनी या प्रकरणी ‘हिट अँड रन’प्रकरणी गुन्हा नोंदवून सत्तरीतील १७ वर्षीय अल्पवयीन चालकासह चार जणांना अटक करण्यात आली.

Sameer Panditrao

साखळी: गोकुळवाडी-साखळी येथे मुख्य रस्त्यावर १९ जून रोजी रात्री ८ वा. च्या सुमारास एक कारने मोटरसायकलवाल्याला चुकीच्या दिशेने जात जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढला. पण साखळीतील लोकांनी या कारचा पाठलाग करून सदर कारला विठ्ठलापूर-साखळी येथे रोखून धरले व पोलिसांना माहिती दिली.

डिचोली पोलिसांनी या प्रकरणी ‘हिट अँड रन’प्रकरणी गुन्हा नोंदवून सत्तरीतील १७ वर्षीय अल्पवयीन चालकासह चार जणांना अटक करण्यात आली.

या प्रकरणात डिचोली पोलिसांनी सुर्ल-ठाणे सत्तरी येथील जयेश लवू गावस, घोटेली केरी सत्तरी येथील साहिल श्रीपाद गावस (वय २७), सुर्ल सत्तरी येथील अतुल आनंद गावकर (वय २८) व सुर्ल सत्तरी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन कार चालकाला अटक केली आहे.

गोकुळवाडी-साखळी येथील राजू कामत यांच्या घराजवळ रस्त्यावर जीए ०३ व्हाय २२२२ या कारने साखळी ते डिचोली या रस्त्यावर पूर्णपणे चुकीच्या दिशेने येत साखळीहून कुडणे येथे आपल्या हिरो स्प्लेंडर या जीए ०४ एम ९७११ क्रमांकाच्या मोटरसायकलने जाणाऱ्या प्रणेश प्रकाश मळीक (वय ३०) याला समोरून जोरदार धडक देऊन ठोकरले.

या धडकेबरोबर प्रणेश मळीक हा उसळून क्रेटा कारच्या बॉनेटवर पडला, तर मोटरसायकल उसळून रस्त्यावर मध्यभागी पडली. मोटरसायकल चालक बचावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT