Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: इथेनॉल प्लांट उभारा, अन्यथा 2 जानेवारीपासून आंदोलन

ऊस उत्पादकांचा इशारा

गोमंतक ऑनलाईन टीम

Sanjivani Sugar Factory: अल्टीमेटम देऊनही राज्य सरकारने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. इथेनॉल प्रकल्प सुरू करा अन्यथा 2 जानेवारीपासून धांरबांदोडा येथील संजीवनी साखर कारखाना परिसरात आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

ऊस उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी समिती सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आंदोलनाचा हा इशारा दिला आहे.

देसाई म्हणाले की, राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आम्ही धारबांदोडा येथे संजीवनी साखर कारखाना परिसरात आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकऱ्यांनी येथे इनेथॉल प्लांटची मागणी लावून धरली आहे. या प्रकल्पात रूची असलेल्यांनी संपर्कही साधला होता. पण सरकारकडून काहीच प्रस्ताव किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कोणतीही प्रतिक्रिया सरकारने दिलेली नाही. त्यामुळे उस उत्पादकांची दिशाभूल होत आहे. त्यामुळेच याबाबत स्पष्ट काय ते सांगावे, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे.

जुलै महिन्यात 120 शेतकऱ्यांना फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनी आंदोलनात फोंडा-बेळगाव हायवेवरील वाहतू रोखून धरली होती. संजीवनी साखर कारखान्याबाबत लिखित आश्वासन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तत्काळ बैठक बोलावून कारखान्याची वर्तमान स्थिती आणि पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याने इथेनॉल प्लांटसाठी कुणी इच्छूक नसल्याचे सांगितले होते.

शेतकऱ्यांनी इथेनॉल प्लांट उभा करण्यात रूची असलेले कोण असेल तर सांगावे, सरकार आवश्यक ती मदत पुरवेल, असे आवाहनही केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "वेळीच सुधारणा केली नाही तर..." चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी गौतमचा शुभमन गिलला 'गंभीर' इशारा! सरावादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल

गोव्यात आता प्राण्यांसाठी एक्स – रे , सोनोग्राफी सुविधा; सोनसोडो – राय येथे लवकरच सुरु होतोय पशु वैद्यकीय दवाखाना

Goa Today's News Live: विठ्ठलापूर साखळीतील वाळवंटीत रंगाला नौकानयन सोहळा

Bicholim: अखेर डिचोली बाजारातील पाण्याची गळती बंद, फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती; 'नवा सोमवार'पूर्वी पाण्याची समस्या सुटणार

"मतचोरी करून पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न" प्रियांका गांधी-वद्रा यांची 'NDA'वर टीका; 65 लाख नावे वगळल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT