Sanjil Kudchadkar Kidnapping Case Dainik Gomantak
गोवा

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Madgaon Police Kidnapping Case: कोंब-मडगाव येथून संजील कुडचडकर यांचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी कारवार येथे दोघांना ताब्यात घेऊन संजील यांची सुटका केली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: कोंब-मडगाव येथून संजील कुडचडकर यांचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी कारवार येथे दोघांना ताब्यात घेऊन संजील यांची सुटका केली. कुडचडे येथील नामवंत डॉक्टर सतीश कुडचडकर यांचा तो मुलगा आहे. या अपहरण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने मडगाव परिसरात खळबळ उडाली होती.

संजील यांच्या मुलीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून अपहरणाची ही घटना घडल्याचे सकृतदर्शनी तपासात आढळल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिली. संजील आणि त्यांची पत्नी लुईझा यांचे संबंध सध्या बिघडले असून ते दोघे विभक्त होण्याच्या वाटेवर आहेत. त्या दोघांनी एकमेकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारीही नोंदविल्या आहेत.

कथित अपहरणाचा हा प्रकार सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. कॅमेऱ्यात हा प्रसंग कैद झाला. त्यात एक महिला व आणखी दोघेजण संजील यांना जबरदस्तीने कारमध्ये घालून नेताना दिसत होते. संजील यांना समुपदेशन केंद्रात दाखल करायचे आहे, असे सांगून त्या दोघांना आणले होते.

संशयितांची ओळख पटली

संशयितांची ओळख पटलीअपहरणप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे ससीर बिन मसूद आणि शाह अली सौदागर अशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यातील मसूद हा मूळ हैदराबाद येथील असून, तो सध्या मायणा-कुडतरी तर सौदागर हा महाराष्ट्रातील सोलापूर येथील असून तो सध्या दवर्ली येथे राहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पत्नीचीही होणार चौकशी

पोलिस अधीक्षक वर्मा यांनी सांगितले की, आम्ही याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे. तपासाअंती सर्व प्रकार समोर येईल. अपहरणासाठी वापरलेली कारही जप्त केली आहे. त्यांच्या पत्नीलाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येईल, असेही वर्मा यांनी सांगितले. चौकशीत यामागील उद्देश स्पष्ट होणार अाहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT