Shigmotsav 2025 Dainik Gomantak
गोवा

Sanguem Shigmotsav: सांगेत रंगणार शिगमोत्सवाची मिरवणूक! फॅन्सी ड्रेस स्पर्धा, रोमटमेळचे आयोजन

Shigmotsav 2025: श्री पाईक देवाला नमन करून बेंडवाडा येथील श्री कानडीपुरुष देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर शिमगोत्‍सव मिरवणुकीला सुरवात होणार आहे.

Sameer Panditrao

सांगे: सांगेत उद्या रविवारी २३ मार्च रोजी शासकीय पातळीवर शिमगोत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. संध्‍याकाळी साडेचार वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा सुरू होईल. तर, साडेसहा वाजता पाहिले रोमटामेळ पथक आपली कला सादर करेल. दरम्‍यान, या उत्‍सवानिमित्त सांगेत सर्वत्र उत्‍साही वातावरण आहे.

श्री पाईक देवाला नमन करून बेंडवाडा येथील श्री कानडीपुरुष देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर शिमगोत्‍सव मिरवणुकीला सुरवात होणार आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, लोककला स्पर्धा, रोमटमेळ आणि नंतर चित्ररथ स्पर्धा होईल. शिमगोत्‍सव यशस्वी करण्‍यासाठी विविध समित्‍यांची निवड करण्यात आली आहे. असून या वेळी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी आयोजन समितीला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रोमटामेळ स्पर्धेसाठी पहिले बक्षीस रुपये ४५ हजार देण्‍यात येईल. दुसरे ३५ हजार, तिसरे २५ हजार, चौथे १५ हजार, पाचवे १० हजार, सहावे ७ हजार तर ५ हजार रुपयांची एकूण सहा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.

लोकनृत्य स्पर्धेसाठी पहिले बक्षीस रुपये २० हजार, त्‍यानंतर अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ८ हजार, ५ हजार आणि प्रत्‍येकीचार हजार रुपयांची सहा उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.

वेषभूषा स्‍पर्धेतील मोठ्या गटासाठी अनुक्रमे बक्षिस रुपये ७ हजार, ५ हजार, ४ हजार, ३ हजार, २ हजार, १ हजार आणि इतर स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. लहान गटासाठी ५ हजार, ३ हजार, १५००, ५०० रुपये तसेच इतर स्‍पर्धकांना प्रत्येकी ३०० रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

चित्ररथासाठी प्रथम बक्षीस ६० हजार रुपये

चित्ररथ स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रुपये ६० हजार, दुसरे ४० हजार, तिसरे ३० हजार, चौथे २० हजार, पाचवे १५ हजार तर सहावे बक्षीस १० हजार रुपये देण्‍यात येईल. शिवाय बक्षिसे न मिळणाऱ्या तेरा चित्ररथांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT