Margao Shigmotsav: मडगावात शिमगोत्सव चित्ररथ मिरवणूकीचा जल्लोष; सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Pramod Sawant: स्वच्छ गोवा, हरित गोवा व नितळ गोवा ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: ओस्सय...ओस्सयच्या गजरात रविवारी मडगावात शिमगोत्सव चित्ररथ मिरवणूक उत्साहात पार पडली. शेवत्या झाडाच्यो लांब ताळयो ...लांब ताळ्यो ...शेवंती फुलल्यो कळ्यो ...!गोपाळा... गोपाळा देवकीनंदन गोपाळा! या पारंपारिक गीतांनी रोमटामेळाच्या पदन्यासाच्या तालावर तसेच ढोलताशाच्या गजरात मठग्राम नगरी दुमदुमली.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे. शिमगो, कार्निवल, मडगावचा दिंडी महोत्सव आदींचा यात समावेश असेल. त्यासाठी स्वच्छ गोवा, हरित गोवा व नितळ गोवा ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

घोडेमोडणी, धनगर नृत्य कुणबी नृत्य आदी लोकनृत्यांचा सुरेख आविष्कार लोकांना पाहायला मिळाला. भव्यदिव्य स्वयंचलित चित्ररथ देखाव्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले.

CM Pramod Sawant
Valpoi News : इतिहासाला उजाळा देणारी सात भाव घोडेमोडणी : विश्वजीत राणे

केरळचे लोकनृत्य पथक, आरोग्य खात्याचा क्षय रोग जागृती देखावा, विरभद्र, समई नृत्य, घोडेमोडणी पथक​ लोकांसाठी खास आकर्षण ठरले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खवंटे, गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष दामोदर नाईक, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर अन्य नगरसेवक ​याप्रसंगी उपस्थित होते. ​होली स्पिरीट चर्च सर्कल ते मडगाव नगरपालिका​ चौकापर्यंत​ मिरवणूक निघाली.

CM Pramod Sawant
Ghodemodni: गुळ्ळे, मोर्ले येथे रंगणार आठ घोड्यांची घोडेमोडणी! ‘भरणूल’ लोककला प्रकाराचे होणार सादरीकरण

लोकांची उस्फूर्त दाद

रोमटामेळात सहभागी झालेल्यांनी पारंपरिक वेशभूषा डोक्यावर रंगबेरंगी फेटे, चौरंग, अबदागिरे सुर्यपाने, छत्र्या, हातात गुढ्या, समोर तोरण व ढोल ताशांचा निदान व त्याच तालावर पदन्यास करीत रोमटामेळ सादर केला. उपस्थित लोकांनीही त्याला उस्फूर्त दाद दिली. मिरवणूक ​बघण्यासाठी लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com