
पणजी: पणजीमध्ये २२ रोजी डी. बी. बांदोडकर मार्गावरून होणाऱ्या पणजी शिमगोत्सव मिरवणुकीवेळी पणजी शहरात वाहतुकीसाठी मार्गबदल करण्यात आला आहे. या मिरवणुकीवेळी दुपारी २ वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत मांडवी नदीच्या बाजूने असलेला बांदोडकर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक इतर रस्त्यांवरून वळवण्यात येणार आहे.या शिमगोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या पथकांनी दिवजा सर्कल येथील मांडवी पुलाखालून सांता मोनिका जेटी येथून ज्या ठिकाणापासून (जुने सचिवालय) मिरवणुकीला सुरुवात होणार आहे, तेथे येणे आवश्यक आहे.
केटीसी सर्कलकडून दिवजा सर्कलकडे पथकांना येण्यास बंदी असेल. ही पथके मेरशी सर्कलकडे बायपास रस्त्यांने वळवण्यात येतील व रायबंदर रस्त्यावरून सांता मोनिक जेटीकडे पाठवण्यात येतील.
पणजी शहरात येणारी वाहतूक नव्या पाटो पुलावरून नेहमीप्रमाणे पुढे आल्यानंतर जुन्या सचिवालयाजवळील बांदोडकर पुतळ्याकडून वळवून ती एम. जी. मार्ग व चर्च चौकाकडे पुढे जाईल. मिरामार येथून कला अकादमीकडे येणारी वाहतूक कांपाल येथील गणेश घुमटीकडून वळवून ती १८ जून रस्ता, कोर्तीन रस्त्यावरून ती मळा - भाटले रस्त्यावरून पुढे जाणार आहे.
अवजड वाहनांना सकाळी ७ पासून ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रवेश करण्यास मनाई असेल. पर्यटन बसेस तसेच व्यावसायिक वाहने दुपारी २ वाजल्यानंतर मिरामार सर्कलकडूनच आतील रस्त्याने वळविली जातील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
पार्किंगची सोय
उत्तर गोव्यातून शिमगोत्सव मिरवणुकीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी ईडीसी प्लाझा/एमएलसीपी/ केटीसी बसस्टँड येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातून येणाऱ्या वाहनांसाठी गोमेकॉ - गोवा विद्यापीठ - एनआयओ सर्कल - मिरामार येथे आल्यानंतर कांपाल परेड मैदानावर पार्किंगची सोय केली आहे.
जोझ फालकांव रस्ता, जुआंव क्रास्टो रस्ता, मॅच कार्नर ते कासा इंटरनॅशनल (एम.जी. रोड), काकुलो बेट ते सांतिनेझ जंक्शन तसेच चर्च चौक ते कोर्तीन फूट ब्रिज येथील रस्ता ‘नो पार्किंग’ झोन म्हणून उद्याच्या एका दिवसासाठी घोषित करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.