Sanguem locals opposes mirabag barrage Dainik Gomantak
गोवा

Mirabag: '..आमचा संगमेश्वर कायमचाच पाण्याखाली जाईल'! मीराबाग बंधाऱ्याला सांगेवासीयांचाही विरोध; सरकारला दिला इशारा

Sanguem locals opposes mirabag barrage: मीराबाग बंधाऱ्याला विरोध दर्शविण्यासाठी सांगेवासीयांनी संगमेश्वर तिरावर एकत्र येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे: संगमेश्वर देव पाण्यात बुडणार या भीतीने आता मीराबाग बंधाऱ्याला विरोध दर्शविण्यासाठी सांगेवासीयांनी संगमेश्वर तिरावर एकत्र येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सरकारने जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करावा न पेक्षा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देण्यात आला.

या वेळी बोलताना सुप्रज नाईक तारी म्हणाले की, नैसर्गिकरित्या संगमेश्वर देवाला अभिषेक होत असताना आता बंधारा बांधल्यास देव कायमचाच पाण्याखाली जाणार आहे. बंधारा न बांधता भरतीच्या वेळी गोड पाणी हवे तितके पम्प वापरून पाणी खेचता येते. आमच्या कोणत्याही ग्रामस्थांचा याला विरोध असणार नाही. पण बंधारा बांधल्यास आमचाही विरोध राहील.

विनय नाईक म्हणाले, निसर्गसंपन्न अशा सांगेवर अनिष्ट नजर पडल्यास संगमेश्वर कायमचाच पाण्याखाली जाईल. मीराबाग येथील ग्रामस्थ विश्वनाथ नार्वेकर म्हणाले, संगमेश्वर पाण्याखाली गेल्यास सांगेचे अस्तित्व नष्ट केल्यासारखे होईल, याबाबत म्हणूनच सरकारने वेळीच फेरविचार करावा. सांगेवासीयांना सरकारने दिलासा द्यावा,असेही ते म्हणाले.

कोणत्याही स्थितीत तडजोड नाही!

जिथे संगम होऊन पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून हजारो भाविकांची श्रद्धा असताना ती श्रद्धाही पुसून टाकण्यासाठी प्रयत्न होत आल्यास सांगेवासीय गप्प बसणार नाहीत, बंधारा रद्द न केल्यास सांगेवासीयांचा आंदोलनात सहभाग होणार हे नक्की. कोणालाही कोणतीही कल्पना न देता बंधारा बांधून देव, गाव नष्ट होत असल्यास कोणत्याही स्थितीत तडजोड केली जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT