Goa Accident News Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News: सांगोल्‍डा अपघातातील कारचालक निर्दोष मुक्त

सांगोल्‍डा येथे झालेल्‍या भीषण अपघातातील कारचालक टी. आर. मंजुनाथ याची येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

दैनिक गोमन्तक

Goa Accident News: सांगोल्‍डा येथे झालेल्‍या भीषण अपघातातील कारचालक टी. आर. मंजुनाथ (रा. तुमकूर- कर्नाटक) याची येथील प्रथमवर्ग न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

हा अपघात 28 जून 2022 रोजी पहाटे पाचच्या सुमारास चोगम रोडवर घडला होता. त्‍यात दुचाकीस्वार कपिल लमाणी (25, बागा) हा मूळ कर्नाटकातील युवक ठार झाला होता, तर व्यंकटेश लमाणी (गदग-कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला होता.

सरकारी पक्षाला संशयित आरोपी हाच अपघातग्रस्त कार चालवत होता हे सिद्ध करता आले नाही. तसेच अपघाताचा कुणीही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. जखमी व्‍यंकटेश हा संशयित कारचालकाची ओळख पटवू शकला नाही.

शिवाय पोलिस आवश्यक पुरावेही सादर करू शकले नाहीत असे निरीक्षण नोंदवून न्यायाधीश शिल्पा पंडित यांनी संशयित आरोपी टी. आर. मंजुनाथ याला निर्दोष मुक्त करणारा निवाडा दिला. मात्र या निवाड्याला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्यासाठी सरकारी पक्षाला सहा महिन्यांची मुदतही दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT