Goa Police: गोवा पोलिसांच्या ‘वन स्टॉप’ सेंटरच्या माध्यमातून अखेर माय-लेकाची भेट...

मानसिक आघातामुळे मध्यप्रदेशमधून रेल्वेने गोव्यात आलेल्या एका महिलेला तिच्या मुलाची भेट मायणा-कुडतरी व मडगाव पोलिसांच्या ‘वन स्टॉप’ सेंटरच्या माध्यमातून झाली.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police Latest News: मानसिक आघातामुळे मध्यप्रदेशमधून रेल्वेने गोव्यात आलेल्या एका महिलेला तिच्या मुलाची भेट मायणा-कुडतरी व मडगाव पोलिसांच्या ‘वन स्टॉप’ सेंटरच्या माध्यमातून झाली.

ही महिला रस्त्यावर फिरत होती.

Goa Police
Goa Congress: आपापसातील मतभेद बाजूला ठेवले तर पुढील सरकार काँग्रेसचे; फ्रान्‍सिस सार्दिन...

मायणा-कुडतरी पोलिसानी तिला या सेंटरमध्ये आणले. ‘वन स्टॉप’ सेंटरच्या आवदा व्हिएगस यांनी मध्यप्रदेशमधील या महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.

त्यामुळे तिचा मुलगा गाडी घेऊन गोव्यात दाखल झाला व आईला परत घरी घेऊन गेला.

Goa Police
Goa Crime News: गोव्यात परदेशी नागरीकांमध्ये सर्वाधिक गुन्हे नायजेरियन, रशियन्सवर; बहुतांश तक्रारी ड्रग्ज तस्करीच्या

ही घटना एक आठवडापूर्वी घडली होती. ही महिला सां जुझे द आरियल येथे रस्त्यावर भटकत होती.

ती प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला या केंद्रात आणून सोडले.

या महिलेचा पती व दोन मुलांचे निधन झाले होते. त्यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Ganesh Chaturthi Celebration 2026
Viresh Borkar RG Goa
World Suicide Prevention Day 2026
Shashank Narvekar Mental Healt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com