Sadanand Shet Tanawade Dainik Gomantak
गोवा

ठरलं! गोव्यातून राज्यसभेसाठी सदानंद शेट तानावडे यांचे नाव निश्चित, कोअर कमिटीचा निर्णय

विद्यमान राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची मुदत जुलैमध्ये संपत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sandnand Tanawade will be BJP official Candidate for Rajya Sabha Elections From Goa

गोव्यातून राज्यसभेसाठी भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांच्या नावाची निश्चिती झाली आहे. कोअर कमिटीने तानावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. अशी माहिती समोर आली आहे.

विद्यमान राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची मुदत जुलैमध्ये संपत असल्याने त्या जागेवर कोणाला पाठवले जाणार? याबद्दल राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर तानावडे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. दरम्यान, तानावडे यांच्या नावावर आज शिक्कमोर्तब झाला आहे.

यापूर्वी पक्षाने सांगितले आणि वरिष्ठ नेत्यांची इच्छा असेल, तर राज्यसभेची निवडणूक लढवेन. असे तानावडे यांनी स्पष्ट केले होते.

लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल

तानावडे यांनी लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल असा विश्वास मागे व्यक्त केला होता.

'पक्षात इतर पक्षातून काही नेते आले, तर त्याचा मतदानावर परिणाम होतोच असे नाही. पक्षाने केंद्रात गेल्या 9 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केलेला विकास, डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेली प्रगती या आधारे राज्यातील जनता येत्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना जनता भरघोस मतांनी विजयी करेल.' असे तानावडे म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT