Chapora River Sand mining
Chapora River Sand mining Dainik Gomantak
गोवा

Chapora River: बेकायदा रेती उपसा थांबेना

दैनिक गोमन्तक

मोरजी: तळर्ण गावात शापोरा नदीपात्रात खुलेआमपणे बेकायदा रात्री रेती उपसा केला जात असल्याची तक्रार स्थानिक बागायतदार, शेतकऱ्यांनी पेडणे उपजिल्हाधिकारी, पेडणे मामलेदार, पेडणे पोलिस आणि मोपा पोलिस स्टेशनला सादर केली आहे.

(Sand mining continues in Chapora River)

या प्रकाराची आजपर्यंत दखल घेतली नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता तरी सरकारने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नंदकिशोर पंडित, जोरान डिसोझा, चंद्रकांत परब, पांडुरंग नाईक, अमय राऊळ, सखाराम राऊळ, फटी राऊळ, भालचंद्र नाईक, राजेश गवंडळकर, दीपक पंडित, रूपेश गवंडळकर, कृष्णा गवंडळकर, संजय राऊळ यांनी केली आहे.

2017 साली दिले परवाने

2017 सालच्या निवडणुकाजवळ येताच सरकारने कडक नियम अटी घालून परवाने दिले. त्यावेळी काहीजणांनी परवाने घेतले, तर काहीजणांनी परवाने न घेताच बेकायदा रेती उपसा सुरू केला. या रेती व्यवसायावर किमान 5 हजार कुटुंबे अवलंबून आहेत. त्यात मजूर, मालक, ट्रक, गॅरेज व्यावसायिक, दुकानदार, लहान-मोठे व्यावसायिक बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक अवलंबून आहेत.

शेती-बागायती केली गिळंकृत

बेकायदा रेती उपशामुळे शापोरा आणि तेरेखोल या नद्यांची पात्रे रुंदावली आहेत. सभोवतालच्या शेती-बागायतीला धोका निर्माण झाला असून बागायतीतील माड जलसमाधी घेताना दिसतात. विशेष म्हणजे, मामलेदार, खाण, भूगर्भ खाते उघड्या डोळ्यांनी ही धूळधाण पाहात आहे. तसेच निसर्ग रक्षणासाठी सरकारी यंत्रणा आहे, ती ही कुचकामी ठरली आहे.

रात्री-अपरात्री नदीत रेती उपसा सुरू असतो. आमचा या व्यवसायाला विरोध नाही. मात्र, आमच्या शेती-बागायतींची मोठी हानी झाली आहे. सुपीक शेतजमीन नदीच्या पात्रात गेली आहे. ती जमीन सरकारने किंवा संबंधित व्यावसायिकांनी आम्हाला परत द्यावी. किंवा नुकसान भरपाई द्यावी. दिवसेंदिवस नदीचे पात्र रुंदावत चालले आहे. - दीपक पंडित

रेल्वे पूल, रस्त्यांनाही धोके

या दोन्ही नद्यांवर धारगळ कोलवाळ येथे पूल आहे. तसेच पेडणेजवळ रेल्वे पूल आहे. तर्मास-हळर्ण, वझरी-पीर्ण, पोरस्कडे रेल्वे पूल, न्हयबाग-सातार्डा, किरणपाणी-आरोंदा, असे अनेक पूल आहेत. शिवाय न्हयबाग ते तोरसेपर्यंतचा राष्ट्रीय रस्ता याच नदीजवळून जातो. तीन वर्षांपूर्वी पोरास्ककडे येथील रेल्वे पुलाजवळचा शंभर मीटरचा रस्ता संरक्षक भिंतीसह तेरेखोल नदीत वाहून गेला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता रेल्वे पुलालाही धोका संभवतो आहे. तर्मास पुलाला धोका निर्माण होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT