Vishwajit Rane: गावच्या विकासात सर्वांनी एकत्र यावे

वांते सत्तरी येथे पंचायत कोपरा बैठकीत नागरिकांचा पाठिंबा
 Vishwajit Pratapsingh Rane
Vishwajit Pratapsingh RaneDainik Gomantak

वाळपई: भिरोंडा पंचायत क्षेत्रातील नागरिकांशी आपले वेगळे सबंध आहेत. भिरोंडा वासियांना येणाऱ्या काळात काहीच कमी पडू देणार नाही, या भागातील युवा व महिला वर्गाच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. असे आश्वासन मंत्री विश्वजित राणे यांनी दिले.

( Minister Vishwajit Pratapsingh Rane promised development in Panchayat election campaign meeting at Satari )

 Vishwajit Pratapsingh Rane
CM Pramod Sawant यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

या पंचायत क्षेत्रांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देऊन येणाऱ्या काळात येथे प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लावली जाणार आहेत. त्यासाठी गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे .आपण सत्तरीच्या विकासासाठी विविध योजना अमलात आणत असून लवकरत आपण जनतेला दिलेल्या आश्वसनाची पुर्तता करणार आहोत. यासाठी आपल्याबरोबर आमदार डाॅ. दिव्या राणे सदैव असे ही ते यावेळी म्हणाले.

 Vishwajit Pratapsingh Rane
संघटीत कार्यावरच यश अवलंबून- डॉ. चंद्रकांत शेट्ये

या भागाच्या विकासासाठी कोणती ही तडजोड नाही

पर्ये मतदारसंघ महत्वाचा आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, सरकारच्या सर्व प्रकारच्या योजना समाजातील सर्व घटकापर्यंत पोचवण्यासाठी नविन पंचायत सदस्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य दिले जाणार आहे. तसेच या भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे. असे ही राणे यावेळी म्हणाले.

युवा पिढीने भरकटू नये

युवा पिढीने कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता भरकटून जाऊ नये, आता पर्यंत आपण राजकारण करताना समाजकारणाचा भाग म्हणून पाहिले आहे. या मुळे राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारच्या सहकार्याने भिरोंडा वासियांनी काहीच कमी पडू देणार नाही असे उद्गार वाळपई आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले.

तसेच त्यांनी वांते सत्तरी येथे पंचायत निवडणूकीत 2 व 3 प्रभागातील उमेदवार बाबुराव दामू गावडे, आणि किरण विश्वनाथ गावडे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कोपऱ्या बैठक गावातील नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राणे यांनी उपस्थितांना गावच्या विकासाला सहकार्य करा असे सांगितले. यावेळी भिरोंडा पंचायतीत बिनविरोध झालेल्या पंच सदस्य मनिषा पिळयेकर, उदयसिंग इंद्रोबा राणे (बिनविरोध), उमेदवार बाबुराव गावडे, किरण गावडे. यांनी उपस्थिती लावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com