illegal sand business Dainik Gomantak
गोवा

Pernem Sand Scam: बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करा ; उगवेवासीय आक्रमक

Pernem Sand Scam: रोज रात्रभर उगवे येथे रेती काढण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या व्यवसायात अनेक रेती व्यावसायिक गुंतले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem Illegal Sand Excavation: पेडणे, उगवे येथे तेरेखोल नदीत रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे रेती काढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने आमच्या शेती, बागायतीच्या जमिनी नदीत कोसळत असून त्यामुळे आमचे उपजीविकेचे साधन नष्ट होत असल्याने मामलेदार, उपजिल्हाधिकारी,

पेडणे पोलिस या सर्वांनी या बेकायदेशीर रेती उत्खननावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी उगवे येथील विनायक महाले व उदय महाले यांनी आज पेडणे मामलेदार कार्यालयात व पेडणे पोलिस ठाण्यात व पेडणे पोलिस उपअधीक्षकांना निवेदन देऊन केली.

विनायक महाले म्हणाले की, न्यायालयाने तेरेखोल नदीत रेती काढण्यावर सरकारने बंदी घातली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून रोज रात्रभर उगवे येथे रेती काढण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या व्यवसायात अनेक रेती व्यावसायिक गुंतले आहेत.

पोरस्कडे ,आमेरे व तोर्से येथे रेती उतरविण्यात येते. यासंबधी आम्ही बेकायदेशीर रेती व्यावसायिकांची व कामगारांची नावे संबधीताना दिलेली आहेत.रेती काढण्यात येत नाही तर हे रेती मजूर काय करतात?

खाण व उद्योग खात्याने काही वेळा अशा बेकायदेशीर रेती काढणाऱ्यांवर कारवाई करून होड्या जप्त केल्या होत्या.

पण कारवाई होण्यापूर्वी रेती माफियांना सूचना मिळत असल्याने ते आपला अवैध व्यवसाय बंद ठेवतात.

बोटी नाहीत, जीपने होड्या पकडणार का?

उदय महाले म्हणाले की, खाण व उद्योग खात्याकडे तक्रार केली तर हे बेकायदेशीर रेतीमाफिया हा व्यवसाय बंद ठेवतात. किनारी पोलिसांकडे तक्रार केली तर आमच्याकडे बोट नाही म्हणून सांगतात.

किनारी पोलिसांकडे बोट नसलेले हे कसले किनारी पोलिस ठाणे ? जीप, मोटरसायकलने येऊन हे नदीतील होड्या पकडणार का ? खाण व उद्योग खाते व किनारी पोलिस यांचे यावरुन साटेलोटे आहे,हे स्पष्ट होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT