Suspension Canva
गोवा

Sancoale Panchayat: गैरवर्तन, निष्काळजीपणा, आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी पंचायत सचिव निलंबित

Sancoale Panchayat Secretary suspended: निलंबन काळात वालीस यांना तिसवाडी येथील बीडीओ कार्यालयात हजेरी लावण्याचे व परवानगीशिवाय कार्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आलेत

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: झुआरीनगर मुरगाव येथील चक्रीवादळ निवाऱ्याच्या व्यवस्थापनात निष्काळजीपणा करणे, गैरवर्तन आणि आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी सांकवाळ पंचायतीचे सचिव ऑर्विल क्लिंटन वालीस यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पंचायत संचालक सिध्दी हळर्णकर यांनी जारी केला आहे.

मुळात ग्रामसेवक असलेल्या वालीस यांना २७ ऑक्टोबर २०२२ रोजी सांकवाळ पंचायत सचिवपदाचा ताबा देण्यात आला होता. तेव्हा सांकवाळ चक्रीवादळ निवारा केंद्राच्या व्यवस्थापन व देखभाल समितीच्या सदस्य सचिव पदाची जबाबदारीही दिली होती. नव्या समितीच्या स्थापनेनंतर निवारा केंद्राचे नियोजन योग्यप्रकारे चालत नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारिणीच्या लक्षात आले.

कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला होता. त्यानुसार दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष आश्‍विन चंद्रू यांना १७ व १८ जुलै रोजी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलेले होते.

मात्र, न्यायालयाकडून आदेशानुसार काही कामांमुळे व्यग्र असल्याचे कळवण्यात आले होते. पावसामुळे मुरगाव तालुक्यात भूस्खलनाच्या घटना घडल्या. काहींना स्थलांतरीत करण्याची गरज असतानाही चक्रीवादळ निवारा केंद्र बंदावस्थेत असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलल्याने कारवाई

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी १९ जुलै रोजी ४.३० वा. निवारा केंद्रासंदर्भातील बैठकांची माहिती, आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, वालीस उपस्थित राहिले नाहीत. सरकारी कामात निष्काळजीपणा, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, गैरवर्तन, अशा कारणास्तव वालीस यांना तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश पंचायत संचालकांनी जारी केला. निलंबन काळात वालीस यांना तिसवाडी येथील बीडीओ कार्यालयात हजेरी लावण्याचे व परवानगीशिवाय कार्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

SCROLL FOR NEXT