Saligao Murder| Goa Murder Dainik Gomantak
गोवा

Saligao Murder: एकाच खोलीत दोघांचे मृतदेह! दुहेरी खुनाच्या घटनेने साळगाव हादरले; संशयित मुंबईकडे फरार झाल्याची शक्यता

Goa Double Murder Case: अभिषेक गुप्ता व संशयित या दोन्‍ही कामगारांमध्‍ये घटनेच्या आदल्या दिवशी वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचा अंदाज आहे की, हा वाद पुन्हा पेटला.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : मुड्डोवाडा-साळगाव येथे गुरुवारी घडलेल्या दुहेरी खुनाच्या घटनेने संपूर्ण गोवा राज्‍य हादरून गेले. रिचर्ड डिमेलो (६५, रा. गिरी-म्‍हापसा) आणि अभिषेक गुप्ता (मूळ इंदूर, मध्यप्रदेश) या दोघांची गळा चिरून आणि भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. दरम्‍यान, मयत रिचर्ड डिमेलो हे तृणमूल काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांचे बंधू होत.

मिळालेल्‍या माहितीनुसार, रिचर्ड डिमेलो हे म्युझिकल पार्टस्‌ दुरुस्ती व्यवसायात कार्यरत होते, तर अभिषेक हा रिचर्ड यांच्याकडे कामगार म्हणून कामाला होता.

काही दिवसांपूर्वीच तो या ठिकाणी राहायला आला होता. पहाटे अभिषेक राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत रिचर्ड आले होते. त्‍याच ठिकाणी रिचर्ड व अभिषेक या दोघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

हे दुहेरी हत्‍याकांड नेमक्‍या कोणत्या उद्देशाने घडवून आणले गेले, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताची ओळख पटविली असून, शोधमोहिमेसाठी पोलिसांची विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत.

अभिषेक याच्यासोबत मुड्डोवाडो येथील भाड्याच्या खोलीत आणखीन एक भाडेकरू राहायचा. त्‍यानेच हे कृत्‍य केल्‍याचा संशय आहे.

खुनामागील पार्श्वभूमी

अभिषेक गुप्ता व संशयित या दोन्‍ही कामगारांमध्‍ये घटनेच्या आदल्या दिवशी वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांचा अंदाज आहे की, हा वाद पुन्हा पेटला आणि त्याच रागातून संशयिताने अभिषेक याच्‍यासह त्‍यावेळी तेथे आलेले रिचर्ड डिमेलो या दोघांची हत्या केली.

तपासाची दिशा

पोलिसांनी घटनास्थळावरून खुनासाठी वापरलेले धारदार हत्यार जप्त केले.

रिचर्ड यांची दुचाकी घेऊन संशयित फरार. नंतर ती सापडली थिवी रेल्वेस्थानकाबाहेर.

संशयित मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेतून फरार झाल्याचा पोलिसांना संशय.

रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी पटविली संशयिताची ओळख.

संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके स्‍थापन; महाराष्ट्र पोलिसांनाही दिली माहिती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT