Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

Pirna Murder Case: पीर्ण खून प्रकरणी कोलवाळ पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींनी केले आत्मसमर्पण; लवकरच होणार मोठा उलगडा?

Pirna Murder Accused Surrender: पोलीस दलाने आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात केली होती आणि त्यांच्यावर सतत दबाव वाढत होता.
Published on

Pirna Murder Case: पीर्ण खून प्रकरणाच्या तपासात आज (4 नोव्हेंबर) एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल पडले. या गुन्ह्यात सामील असलेल्या दोन आरोपींनी कोलवाळ पोलिसांसमोर (Colvale Police) आत्मसमर्पण केले. पोलिसांनी या दोघांनाही तातडीने अटक केली.

1. रवीश्वर नाईक (रा हणजूण) 2. विठ्ठल तुयेकर (रा. कांदोळी) अशी या आत्मसमर्पण केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींचा पीर्ण खून प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या हाय-प्रोफाइल प्रकरणानंतर पोलीस या आरोपींचा (Accused) कसून शोध घेत होते. पोलीस दलाने आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात केली होती आणि त्यांच्यावर सतत दबाव वाढत होता. अखेरीस, त्यांनी स्वतःहून कोलवाळ पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले.

Goa Crime News
Goa Murder Case: गाडी सापडली कणकवलीत, संशयितांकडून बेदम मारहाण; पीर्ण येथील खूनप्रकरणाचा वाचा घटनाक्रम..

या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस आता या हत्याकांडामागील नेमके कारण (Motive) आणि घटनेचे संपूर्ण तपशील (Details) जाणून घेण्यासाठी त्यांची कसून चौकशी करतील. या प्रकरणातील इतर संभाव्य आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरु आहे.

Goa Crime News
Goa Murder Case: प्रियकरासाठीच आईने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला; रुग्णालयात नेले म्हणून प्रकरणाला वाचा फुटली

काय आहे नेमकं प्रकरण?

पीर्ण परिसरातील उघड्या पठारावर एका 25 ते 30 वयोगटातील तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत्यू हा मारहानीतून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या प्रकरणाचा वेगाने तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं होतं तर इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी रविवारी (2 नोव्हेंबर) रोजी तिघांना अटक केली. यातच आता दोघांनी आत्मसमर्पण केल्याने याप्रकरणी मोठा उलगडा होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com