India vs New Zealand ODI: न्यूझीलंडला मोठा धक्का! स्टार सलामीवीर दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर; 'या' खेळाडूची संघात एन्ट्री

Devon Conway Ruled Out: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात झाली असून, पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे.
Devon Conway Ruled Out
Devon Conway Ruled OutDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात झाली असून, पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर डेव्हॉन कॉनवे दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. सुरुवातीला तो केवळ पहिल्या सामन्याला मुकणार असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, दुखापतीतून अपेक्षित वेळेत सावरता न आल्याने त्याला उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या मालिकेत कॉनवेची अनुपस्थिती न्यूझीलंडसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. सलामीला फलंदाजी करताना संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. त्यामुळे त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते.

सरावादरम्यान सहकारी खेळाडूशी धडक; कॉनवेच्या डोक्याला दुखापत

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सराव सत्रात ही घटना घडली. क्षेत्ररक्षणाचा सराव करताना झेल पकडण्याच्या प्रयत्नात डेव्हॉन कॉनवेची सहकारी खेळाडू मॅट हेन्रीशी जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत दोन्ही खेळाडूंच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर संघाच्या वैद्यकीय पथकाने दोघांची तपासणी केली.

या दुखापतीमुळे कॉनवे आणि हेन्री या दोघांनाही पहिल्या वनडे सामन्यात खेळता आले नव्हते. कॉनवे दुसऱ्या सामन्यापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्याच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. डोक्याला झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आणखी विश्रांतीची आवश्यकता असल्याचे समोर आले. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता न्यूझीलंड व्यवस्थापनाने त्याला संपूर्ण मालिकेतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला.

Devon Conway Ruled Out
Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

कॉनवेच्या जागी निक केलीला संधी; संघात महत्त्वाचा बदल

डेव्हॉन कॉनवेच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडने निक केलीचा संघात समावेश केला आहे. यापूर्वी निक केलीची निवड चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी करण्यात आली होती. मात्र, कॉनवे दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर निवड समितीने त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठीही संघात स्थान दिले आहे.

त्यामुळे आता मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी न्यूझीलंडच्या फलंदाजीच्या समीकरणात बदल होणार आहे. कॉनवेच्या जागी निक केलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी न्यूझीलंडचा सुधारित संघ

डेव्हॉन कॉनवेच्या माघारीनंतर न्यूझीलंडने दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यासाठी सुधारित संघ जाहीर केला आहे.

न्यूझीलंडचा संघ : विल यंग, हेन्री निकोल्स, मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, निक केली, टॉम लॅथम, टिम सेफर्ट, जेकब डफी, मॅट हेन्री, काइल जेमिसन, ब्लेअर टिकनर आणि मॅथ्यू फिशर.

चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी असा असेल संघ

मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघात काही वेगळ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंडचा संघ : फिन अ‍ॅलन, मार्क चॅपमन, विल यंग, मायकेल ब्रेसवेल, निक केली, मिचेल सँटनर (कर्णधार), मिचेल हे, टिम सेफर्ट, क्रिस्टियन क्लार्क, जेकब डफी, मॅथ्यू फिशर, लॉकी फर्ग्युसन आणि ब्लेअर टिकनर.

Devon Conway Ruled Out
Goa Electoral Roll: मतदार यादीतून 6 जणांची नावे वगळणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका

मॅट हेन्री तंदुरुस्त; दुसऱ्या सामन्यात पुनरागमनाची शक्यता

कॉनवेसोबतच दुखापत झालेला वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याच्यासाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यालाही पहिल्या वनडे सामन्यात खेळता आले नव्हते. मात्र, आता तो तंदुरुस्त झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

एकीकडे कॉनवेच्या रूपाने न्यूझीलंडला मोठा धक्का बसला असताना, हेन्रीच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी विभागाला बळ मिळू शकते. आता भारतीय संघाविरुद्ध न्यूझीलंड कोणत्या रणनीतीने मैदानात उतरतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.