Kadamba Bus Strike: 12 नोव्हेंबरला कदंब बससेवा ठप्प होणार? 22 मागण्यांसाठी चालक-कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत!

Kadamba Workers Pending Demands: राज्य सरकारने विविध प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास १२ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय संप करण्याचा इशारा कदंब वाहतूक महामंडळाचे चालक आणि संलग्न कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
Kadamba Workers Pending Demands
Kadamba Bus StrikeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्य सरकारने विविध प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास १२ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय संप करण्याचा इशारा कदंब वाहतूक महामंडळाचे चालक आणि संलग्न कर्मचाऱ्यांनी दिला आहे. ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’शी (आयटक) संलग्न असलेल्या कदंब चालक आणि संलग्नित कर्मचारी संघटनेची आज पणजीतील कदंब बसस्थानक परिसरात बैठक झाली. यावेळी महामंडळाचे कर्मचारी तसेच आयटकचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयटक नेते ख्रिस्तोफर फोन्सेका म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपावर ठाम राहण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. यासंदर्भात संपाची नोटीसही सरकारला दिली आहे. कदंब कर्मचाऱ्यांच्या २२ मागण्या आहेत. यापूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सरकारला संपाविषयी सूचित केले होते. तरीही सरकारने काही मागण्यांविषयी केवळ घोषणा केल्या आहेत. त्याची लेखी हमी किंवा अधिसूचना काढलेली आहे. आम्ही केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये कर्मचाऱ्यांना ३४ महिन्यांची थकबाकी आणि १६ वर्षांची भविष्य निर्वाह निधीची थकबाकी या प्रमुख मागण्या आहेत.

Kadamba Workers Pending Demands
Goa Electoral Roll: मतदार यादीतून 6 जणांची नावे वगळणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला दणका

त्याचबरोबर कदंब वाहक (कंडक्टर) आणि चालकांना त्रासदायक ठरणारी नवीन तिकीट देण्यासाठीची एटीएम मशीन सेवा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्याला संघटनेचा विरोध नाही. परंतु त्यामुळे कामगारांना जो त्रास होत आहे किंवा दिला जात आहे तो दिला जाऊ नये, अशी आमची मागणी आहे. कारण मशीन वापरण्याची सक्ती केल्यास हिशेबात तफावत निर्माण होऊन कर्मचाऱ्यांना थकबाकीदार (डिफॉल्टर) ठरवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची भीती आहे.

काही महत्त्वाच्या मागण्या

इलेक्ट्रिक बसचालकांना ३६ हजार रुपये वेतन आणि अतिरिक्त सवलती द्याव्यात.

कदंबची बस सेवा सुधारण्यासाठी ३०० डिझेल बसेस सेवेत दाखल कराव्यात.

कर्मचाऱ्यांना राहण्याची जागा, पिण्याचे पाणी आणि शौचालयाची समस्या सोडविण्यासाठी त्वरित पावले उचलावीत.

Kadamba Workers Pending Demands
Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.