Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: ...यामुळे साळेरीवासीयांचा पोलिस ठाण्‍यावर मोर्चा

व्यावसायिक वैमनस्यातून साळेरी-खोला येथील पिता-पुत्राला मारहाण करण्याची घटना बुधवारी आगोंद येथे घडली होती.

दैनिक गोमन्तक

Goa News: व्यावसायिक वैमनस्यातून साळेरी-खोला येथील पिता-पुत्राला मारहाण करण्याची घटना बुधवारी आगोंद येथे घडली होती. याबाबत तक्रार करूनही पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले नसल्याच्‍या निषेधार्थ संतप्त झालेल्या साळेरीवासीयांनी काल आगोंद पोलिस आऊट पोस्टवर शांततेत मोर्चा काढला. तसेच संशयितांना अटक करण्याची मागणी केली.

साळेरी येथील गणू धुरी व वासुदेव गणू धुरी यांना बंदर कप्तान व पर्यटन खात्याने जलसफर व्‍यवसायासाठी परवाना दिलेला आहे. नेहमीप्रमाणे पिता-पुत्र व्यवसायानिमित्ताने आगोंद किनाऱ्यावर आले असता त्याच व्यवसायात असलेल्या तेथील काही व्यावसायिकांनी पिता-पुत्राला जबर मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी घडली.

या प्रकरणी धुरी पिता-पुत्राने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा म्हणून त्याची नोंद केली. पुत्र वासुदेव याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, मात्र वडील गणू यांनी आपल्याला मारहाण झाल्याचे पोलिसांना सांगितले नाही. त्यामुळे त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले नसल्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी सांगितले.

दरम्‍यान, पोलिसांना भेटलेल्‍या शिष्‍टमंडळात सुनील पागी, लक्ष्मीकांत पागी, नंदकुमार पागी, अन्‍य ग्रामस्‍थ, महिला व युवकांचा मोठा भरणा होता.

पाच दिवसांत कारवाई करा, अन्‍यथा सर्व पर्याय खुले

साळेरी-खोला येथील रहिवाशांनी पिता-पुत्राला झालेल्‍या मारहाणीचा निषेध म्‍हणून काल पोलिस आऊट पोस्‍टवर मोर्चा काढून संशयितांना ताब्यात घेण्याची मागणी केली. यावेळी सुमारे 300 पेक्षा जास्‍त ग्रामस्‍थ उपस्‍थित होते. साळेरी-खोला व आगोंद किनारा संलग्न आहे. व्यावसायिक वैमनस्यातून ही घटना घडली आहे.

तक्रारीनंतर पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी तक्रारदार व संशयितांची पोलिस ठाण्यात एक महत्वपूर्ण बैठकही घेतली. या बैठकीत पाच दिवसांत संशयितांवर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही अन्य पर्यायांचा विचार करणार असल्याचा इशारा साळेरीतील ग्रामस्‍थांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT