Goa Rain News Dainik Gomantak
गोवा

Goa: सभागृहावर पडले झाड, 2 वाहनांचे नुकसान; पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड

Goa rain: रावणफोंड येथे अन्य एका घटनेत एक झाड दोन वाहनावर पडून, ५० हजारांचे नुकसान झाले. दलाच्या जवानांनी ९ लाखांची मालमत्ता वाचविली.

Sameer Panditrao

मडगाव: पावसामुळे सासष्टीत अनेक ठिकाणी पडझड झाली, त्यामुळे काही ठिकाणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. रावणफोंड येथे मिलिटरी कॅम्पच्या सभागृहावर झाड पडून मालमत्तेचे नुकसान झाले. मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी नंतर घटनास्थळी जाऊन झाडाच्या फांद्या कापून १ लाखांची मालमत्ता बचावली.

रावणफोंड येथे अन्य एका घटनेत एक झाड दोन वाहनावर पडून, ५० हजारांचे नुकसान झाले. दलाच्या जवानांनी ९ लाखांची मालमत्ता वाचविली. याच भागात एक झाड वीज वाहिन्या व रस्त्यावर उन्मळून पडले.

अंबाजी येथे एका इमारतीवर झाड पडून खिडकीची तावदाने फुटून १० हजारांचे नुकसान झाले तर जवानांनी दीड लाखांची मालमत्ता वाचविली. पाजिफोड मडगाव येथे एका घरावर झाड पडून दोन हजाराची हानी झाली. नेसाय येथे रस्त्यावर एक झाड पडले.

कुठ्ठाळीत भिंत कोसळली!

कुठ्ठाळी: नावता-कुठ्ठाळी येथील रहिवाशी पुष्पा प्रकाश नाईक यांच्या घराची मातीची भिंत कोसळून घराचे नुकसान झाले. त्यांच्याकडे घराची दुरुस्ती करण्यासाठी पैसे नाहीत. यासाठी कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ यांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांना मुख्यमंत्री मदत निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एअरपोर्टवर हायव्होल्टेज ड्रामा! इंडिगोचं विमान अचानक रद्द, संतापलेल्या विदेशी महिलेनं काउंटरवर चढून केला राडा Watch Video

नवरा भाड्याने पाहिजे! पुरुषांची संख्या कमी झाल्याने ‘या’ देशातील महिला त्रस्त; तासावर मोजले जातायेत पैसे

आलिशान बंगला, महागड्या गाड्या अन् बरच काही! बुमराह, जडेजा, अय्यर... कोणाची लाईफस्टाइल सर्वात 'रॉयल'? तिघांची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

Goa Politics: 'युती करणार नाही, इतरांना करू देणार नाही' मनोज परब यांच्या फेसबुक पोस्टची चर्चा; ये तुकाराम को चाहिये क्या?

'...म्हणून गोवा सोडलं', आयोजकांनी पहिल्यांदाच सांगितलं IBW हलवण्याचं कारण; नेमका गोंधळ काय?

SCROLL FOR NEXT