Salcete No Development Zone Dainik Gomantak
गोवा

Salcete No Development Zone: सासष्टीतील 1.02 कोटी चौमी जमीन 'ना विकास क्षेत्र' करण्याचा प्रस्ताव! 5 गावांचा समावेश, ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविण्यात आल्या

TCP Act Section 39A Goa: बाणावली, कुडतरी, दिकरपाल आणि सां जुझे द आरियाल या सासष्टीतील पाच गावांतील विस्तीर्ण भूभागाचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: नगर व ग्रामनियोजन खात्याने सासष्टी तालुक्यातील सुमारे १ कोटी १ लाख ८९ हजार ४८३ चौरस मीटर (१.०२ कोटी चौ. मी.) क्षेत्र ‘ना विकास क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. टीसीपी कायद्यातील कलम ३९(अ) अंतर्गत हा प्रस्ताव असून, त्यावर नागरिकांकडून ३० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागविल्‍या आहेत.

या प्रस्तावात मुळे, बाणावली, कुडतरी, दिकरपाल आणि सां जुझे द आरियाल या सासष्टीतील पाच गावांतील विस्तीर्ण भूभागाचा समावेश आहे. हे क्षेत्र ‘अविकसित क्षेत्र’ म्हणून घोषित झाल्यास भविष्यातील बांधकामे व विकासकामांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. टीसीपी खात्याने संबंधित गावांतील नागरिक, जमीनमालक, ग्रामपंचायती आणि अन्य इच्छुक पक्षांना लेखी हरकती व सूचना सादर करण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील जमीन रूपांतरण प्रक्रियेला वेग देत नगर व ग्रामनियोजन (टीसीपी) खात्याने टीसीपी कायद्याच्या कलम ३९(अ) अंतर्गत आणखी १८ भूखंडांचे वसाहत (सेटलमेंट) विभागात रूपांतर करण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. या प्रस्तावात एकूण २५ हजार १७४ चौरस मीटर क्षेत्राचा समावेश असून, नागरिकांकडून ३० दिवसांच्या आत सूचना, हरकती मागविल्‍या आहेत.

कलम ३९(अ) अंतर्गत होणाऱ्या जमीन रूपांतरणांवर यापूर्वीही पर्यावरणीय आणि नियोजनाच्या मुद्द्यांवरून चर्चा झाली आहे. कृषी, नैसर्गिक व मोकळ्या जमिनींचे वसाहत विभागात रूपांतर करण्यास स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून आक्षेप घेतले जात आहेत. टीसीपी खात्याने प्रस्ताव सार्वजनिक करून नागरिक, ग्रामस्थ आणि संबंधित पक्षांना लेखी सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन केले आहे. प्राप्त हरकतींचा विचार केल्यानंतर या प्रस्तावांवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

अनियंत्रित शहरीकरणाला घालणार आळा

पर्यावरणीय, नैसर्गिक आणि नियोजनात्मक महत्त्व लक्षात घेऊन या भूभागाला ‘नो-डेव्हलपमेंट झोन’ म्हणून राखून ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. अनियंत्रित शहरीकरणाला आळा घालणे आणि संवेदनशील भूभागाचे संरक्षण करणे हा या प्रस्तावामागील उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT