Sal River Pollution Dainik Gomantak
गोवा

Sal River: साळ नदीप्रश्‍नी काँग्रेस आक्रमक! आमदारांच्या भूमिकेवर जोरदार टीका; कायमस्वरूपी तोडग्याची केली मागणी

Sal River Congress Protest: बाणावली काँग्रेस गट समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत साळ नदीसंदर्भातील विद्यमान आमदारांच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: साळ नदीप्रश्‍‍नी बाणावलीचे आमदार केवळ लोकांची दिशाभूल करत आहेत. प्रत्यक्षात ठोस उपाययोजना करण्याऐवजी ते दिखाऊपणा करत असल्याचा आरोप बाणावली काँग्रेस गटाच्या कार्यकारी समिती सदस्य पॉल लोबो यांनी केला.

बाणावली काँग्रेस गट समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत साळ नदीसंदर्भातील विद्यमान आमदारांच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली. यावेळी गटाध्यक्ष किथ ग्रासियस, जिल्हा पंचायत सदस्या लुईझा रॉड्रिगीस, सायमन बार्रेटो, सोलन फुर्तादो आदी उपस्थित होते.

पॉल लोबो म्हणाले की, साळ नदीतील प्रदूषण चिंताजनकरीत्या वाढले आहे. या नदीतील मासळी खाणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे संबंधित मासळीची प्रायोगिक तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, नदीतून सांडपाणी सोडण्यासाठी पाईप टाकण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

या पाईपमधून थेट नदीपात्रात सांडपाणी सोडले जात असल्याने ते तत्काळ हटविण्याची मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. साळ नदीप्रश्नी तात्पुरत्या उपाययोजना नकोत, तर कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यावश्यक आहे, असे यावेळी सांगण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

SCROLL FOR NEXT