Sal Menkure road closed Dainik Gomantak
गोवा

Sal: भलेमोठे झाड कोसळले, वीजवाहिन्या तुटल्या; साळ-मेणकुरे मार्गावरील वाहतूक 6 तास बंद

Dhumase village roadblock: विद्यार्थी, नोकर व बाजारहाट करणाऱ्यांना वेळेवर आपला स्थानी पोहोचता आले नाही. हे आंब्याचे झाड वादळी वाऱ्यामुळे पहाटे चार वाजता उन्मळून पडले.

Sameer Panditrao

साळ: साळ-मेणकुरे या मार्गावरील धुमासे गावात मुख्य रस्त्यावर गुरुवारी पहाटे भला मोठा आम्रवृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक सहा तास बंद राहिली. या गावाला जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने बाहेरगावी निघालेल्यांची बरीच कुचंबणा झाली.

विद्यार्थी, नोकर व बाजारहाट करणाऱ्यांना वेळेवर आपला स्थानी पोहोचता आले नाही. हे आंब्याचे झाड वादळी वाऱ्यामुळे पहाटे चार वाजता उन्मळून पडले. त्यात वीज वाहिन्यांचेही नुकसान झाले. काही फांद्या वाहिन्यांवर अडकल्या होत्या, तरीही वीज प्रवाह चालू होता.

पहाटे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले, परंतु वीज पुरवठा सुरू असल्याने ते माघारी फिरले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वीज प्रवाह खंडित केला.

आनंद नाईक यांचे दहा हजारांचे नुकसान

उन्मळून पडलेल्या या झाडामुळे आनंद नाईक यांचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात सहा कवाथे , अंगणातील पत्र्याचे छत व परसबागेचेही नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT