Sal Electricity Problem: अख्खी रात्र काळोखात! गोव्यातील 'या' गावामध्ये 15 तास वीज गायब; नागरिक हैराण

Goa Electricity Problem: विजेबाबत साळ हा गाव सुस्थितीत आहे, पण गावातील चित्र वेगळेच आहे. येथे उपकेंद्र आहे, पण पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. छोट्या कामांना कासारपाल येथील वीज कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो
Power Outrage
Electricity ProblemX
Published on
Updated on

साळ: डिचोली तालुक्यातील साळ येथे शुक्रवारी (ता. ४) मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ‘म्हालकुम भाटले’ जमीन क्षेत्रात मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एका झाडाच्या फांद्या वीजतारांवर कोसळून एक वीजखांब मोडला व वीजतारा तुटल्याने खालचावाडा - साळ येथील नागरिकांना तब्बल १५ तास विजेविना काढावे लागले.

त्या दिवशी रात्री वीज खंडित होण्याचे कारण ग्रामस्थांना कळले. त्यानंतर वीज खात्याला दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली, पण रात्री वीज खांबावरील तुटलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने ते माघारी फिरले.

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता वीज खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोचल्यावर मोडलेला खांब काढून नवीन खांब उभा केला व वीजतारा जोडून वीजप्रवाह सुरू करेपर्यंत संध्याकाळचे ३.३० वाजले. त्यानंतर वीजपुरवठा सुरू झाला.

Power Outrage
Goa Electricity: उत्तर-दक्षिण गोव्‍यातील वीज वहन झाले सोपे; धारबांदोडा-शेल्डे 220 किलोवॅट वाहिनी, वीज उपकेंद्र कार्यान्वित

विजेबाबत साळ हा गाव गोव्याच्या पटलावर सुस्थितीत आहे, पण गावातील चित्र वेगळेच आहे. येथे वीज उपकेंद्र आहे, पण पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. छोट्या छोट्या कामांना कासारपाल येथील वीज कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो, पण तेथील कर्मचारी वर्गाला क्षेत्र मोठे असल्याने ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत. भूमिगत केबलयुक्त गाव पण अजून ठिकठिकाणी खांबावर लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या दिसतात. वारंवारच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त बनले आहेत.

Power Outrage
Sal River: चिंतेची बाब! साळ नदीचे अस्तित्व धोक्यात, आसपासच्या शेतीला धोका; प्रदूषणमुक्तीसाठी 'आप'चे आवाहन

ताळगावातही विजेचा लपंडाव

शनिवारी रात्रभर ताळगाव परिसरात विशेषत: दुर्गावाडी, मार्केट परिसरात विजेचा लपंडाव सुरू होता. पावसाची उघडझाप सुरू होती. त्यातच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रात्री अनेकदा वीज खंडित होत होती. त्रस्त नागरिकांनी वीज खात्याच्या कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र, फोन उचलला जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com