प्रिया खांडेपारकर Dainik gomantak
गोवा

Goa : साकोर्डा पंचायत राबवणार ‘पंचायत तुमच्या हाती’ उपक्रम

धारगे येथे बैठक : ग्रामस्थांच्या समस्या समजून घेण्यासाठी पंचायतीचा प्रयत्न

गोमन्तक डिजिटल टीम

तांबडीसुर्ला : ‘पंचायत तुमच्या हाती’ हा उपक्रम साकोर्डा पंचायतीने राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सरपंच प्रिया खांडेपारकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग एक धारगे येथील श्री महामाया देवस्थानात बैठक पार पडली. पंचायत सचिव भूषण तावडे, स्थानिक पंच संजना नार्वेकर, तुळशीदास वेत्रेकर व ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते.

प्रारंभी सचिव भूषण तावडे यांनी घनकचरा, ओला कचरा, सांडपाणी यांच्या विल्हेवाटीविषयी सविस्तर माहिती ग्रामस्थांना दिली. गावात कुणीही कचरा ,प्लास्टिक बाटल्या अथवा प्लास्टिक जाळू नका. त्यामुळे घातक वायू प्रदूषण होते. सांडपाणी जिरवण्यासाठी पंचायत मोफत शोष खड्ड्याची गरजेनुसार व्यवस्था करणार आहे,असेही त्यांनी सांगितले. गारुडाची नदी - तांबडीसुर्ल, धारगे येथील बंधारा, बाराभूमी मंदिर परिसर, बाराभूमी मंदिराक़डील अपघात प्रणव पुलाजवळ, तयडे येथील पावसाळी धबधबा परिसरात कचरा टाकल्याचे आढळल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

पावसाळ्यात पर्यटकांच्या संख्या वाढत असल्याने या भागात पोलिस गस्त ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. बाराभूमी मंदिर, सातेरी मंदिर व लईराई मंदिर- बट्टर, सातेरी मंदिर - तयडे येथे शौचालय बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. खोपीचीगाळ - बट्टर येथील तळीच्या दुरुस्तीची मागणी वसंत गिरोडकर यांनी बैठकीत केली. मधुकर शिड्डेकर यांनी घरामागे गटारात टाकलेले दगड काढण्याची मागणी केली.

तयडेत विहिरीचे पाणी तपासावे !

तयडे येथील जुन्या विहिरीच्या पाण्यावर गावातील लोकवस्ती सुमारे ४५ वर्षापेक्षा अधिक वर्षे अवलंबून होती.परंतु या वर्षी सदर विहिरीचे पाणी उकळल्यावर पाण्यावर एक प्रकारचा थर तयार होत असून पाण्याला उग्र वास येत असल्याने त्या पाण्याची तपासणी करण्याची मागणी बैठकीत उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी पंचायतीकडे केली आहे. पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासण्यात येईल, असे पंचायत सचिव भूषण तावडे यांनी ग्रामस्थांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

Weather Update: धारबांदोडा, वाळपई, सांगेत पावसाची नव्‍वदी पार; सरासरीतील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकच

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ, थकबाकीची रक्कमही मिळणार

SCROLL FOR NEXT