Goa Tourism : कुळे पंचायतीला पावला ‘दूधसागर’

पर्यटनामुळे आर्थिक स्रोत भक्कम : स्वबळावर कोट्यवधींची विकासकामे मार्गी
Goa Dudhsagar Fall
Goa Dudhsagar FallDainik Gomantak
Published on
Updated on

एकनाथ खेडेकर

कुळे : कुळे-शिगाव पंचायतीला घरपट्टी तसेच इतर करांशिवाय आणखी कोणतेच उत्पन्नाचे स्रोत नव्हते. मात्र, पर्यटन हंगामात दूधसागर धबधब्यामुळे ही पंचायत आर्थिकदृष्ट्या मजबूत झाली आहे. दूधसागर धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून एका लाईफ जॅकेटच्या मागे 40 रुपये शुल्क आकारले जाते. शिवाय इतर मार्गांनी या पंचायतीचा आर्थिक स्रोत भक्कम बनला आहे.

प्रारंभी या जॅकेटच्या शुल्काची किंमत 30 रुपये होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एका जॅकेटमागे 40 रुपये शुल्क आकारले जात असून ते पुरवणाऱ्या कामगारांना जॅकेटमागे 10 रुपये पंचायत देते. सध्या पर्यटकांना जॅकेट पुरवण्यासाठी 22 कामगार आहेत. या आर्थिक मिळकतीच्या बळावर गेल्या आठवड्यात पंचायतीने कोट्यवधींची विकासकामे हाती घेतली असून या कामांचा शुभारंभ आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

Goa Dudhsagar Fall
Tourism' sector: इन द मिरर ऑफ द अदर

दूधसागर धबधब्याला 2 ऑक्टोबर 2022 ते 10 मार्च 2023 या कालावधीत 26,85,513 देशी-विदेशी पर्यटकांनी भेट दिली, तर जीप असोसिएशनच्या 38,359 ट्रिप्स झाल्या. आमदार गावकर यांच्या सहकार्याने लाईफ जॅकेट उपलब्ध झाल्याने पंचायतीला आर्थिक स्रोत मिळाला आहे, असे एका माजी पंचांनी सांगितले.

Goa Dudhsagar Fall
Goa Tourism: गोव्याला येण्यापूर्वी ऑनलाईन माहिती पाहतायं? मग ही बातमी वाचाच; नाहीतर...

पावसाळी पर्यटनही सुरू व्हावे!

पावसाळ्यात दूधसागर नदीला पूर येत असल्यामुळे धबधब्यापर्यंत जीप वा अन्य कोणतेही वाहन जात नाही. मात्र, येथे पूल उभारल्यास पावसाळ्यातही पर्यटकांना धबधब्यापर्यंत जाता येईल आणि स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल. त्यामुळे पंचायतीच्या महसुलातही भर पडणार आहे. याची आमदार डॉ. गणेश गावकर यांनी दखल घेऊन पावसाळ्यातही पर्यटन सुरू राहावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

‘लाईफ जॅकेट’ने दिला मदतीचा हात

दूधसागर नदीत पर्यटक बुडण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. त्या रोखल्या जाव्यात, या दृष्टीकोनातून सचिव गोकुळदास कुडाळकर, जिल्हाधिकारी अग्रवाल, पोलिस निरीक्षक तथा सध्याचे उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या सहकार्याने पर्यटकांसाठी लाईफ जॅकेट उपलब्ध केले. पर्यटकांना सुरुवातीला 30 रुपये दराने लाईफ जॅकेट सक्तीचे केले होते. हे जॅकेट देण्यासाठी कामगारांची नियुक्ती केली. त्यामुळे दुर्घटना टळल्या, शिवाय पंचायतीला आर्थिक स्रोतही उपलब्ध झाला.

Goa Dudhsagar Fall
Goa Tourism : नेत्रावती, गांधीधाम रेल्वेमुळे पर्यटनाला मिळेल चालना

कुळे-शिगाव पंचायतीला लाईफ जॅकेटच्या माध्यमातून 80 ते 90 लाखांचा महसूल मिळतो. काही प्रमाणात घरपट्टी, सोपो कराचेही उत्पन्न आहे. पंचायत आर्थिकदृष्ट्या भक्कम असली तरी गावाचे क्षेत्र मोठे आहे. स्वच्छता व इतर कामांसाठी निधी खर्च होतो. गावाच्या विकासासाठी याच फंडातील पैसे सर्वांच्या मान्यतेने आम्ही वापरतो.

- गोविंद शिगावकर, सरपंच, कुळे-शिगाव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com