Sakhyahari Utsav Savoi Verem Goa Dainik Gomantak
गोवा

Sakhyahari Jatra: "सख्याहरी माझ्या पांडुरंगा"!! निघणार भव्य मिरवणूक; सावईवेऱ्यात मदनांताच्या जत्रौत्सवाला सुरूवात

Sakhyahari Utsav Savoi Verem Goa: संपूर्ण मिरवणुकीच्यावेळी लोकं" हरी रे माझ्या पांडुरंगा, सख्याहरी माझ्या पांडुरंगा" असा जयघोष करतात.

Akshata Chhatre

Sakhyahari kalotsav, Savoi Verem Goa

सवाईवेरे: जपलेल्या परंपरा आणि संस्कृतीसाठी गोवा आजही ओळखला जातो आणि गोव्याच्या परंपरेतील एक महत्वाचे पान म्हणजे इथे होणार जत्रौत्सव. गावागावात मंदिरांमध्ये सध्या जत्रौत्सवाला उधाण आले आहे आणि यांपैकीच एक म्हणजे सवाईवेऱ्याच्या मदनांताची किंवा अनंताची जत्रा. बुधवार (दि. ४ डिसेंबर) पासून या जत्रेला सुरुवात झाली आहे. आज म्हणजेच पहिल्या दिवशी सख्याहरीने या अनंतोत्सवाला प्रारंभ झाला असून हा उत्सव १० डिसेंबर पर्यंत सुरु राहील.

सवाईवेऱ्यातील हे मंदिर गोव्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थांपैकी एक आहे. या अनंत देवस्थानातील वार्षिक अनंतोत्सवाला 'सख्याहरी' म्हणून खास ओळखलं जातं. एकूणच आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात दुसऱ्या दिवशी सांगोडोत्सव, तिसऱ्या दिवशी गरुडासन, चौथ्या दिवशी विजयरथ, पाचव्या दिवशी सिंहासन, सहाव्या दिवशी हत्तीअंबारी आणि सातव्या दिवशी शेषासन असे कार्यक्रम होणार आहेत.

शनिवारी (दि. ७ डिसेंबर) रोजी पंडित शौनक अभिषेकी यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम देखील रात्री ८ वाजता आयोजित केला आहे.

असं म्हणतात या गावात जेव्हा श्रीअंनत म्हणजेच भगवान विष्णू अवतरले तेव्हा गावकऱ्यांनी सुपारीची कोवळी झाडं घेऊन आनंदाने नाचायला सुरुवात केली होती. त्या दिवसापासून ते आजपर्यंत हा दिवस सख्याहरी म्हणून ओळखला जातो.

गावकरी या उत्सवाच्या वेळी हातात सुपारीची छोटी झाडं घेऊन वाजत-गाजत अनंताची मिरवणूक काढतात. या मिरवणुकीच्यावेळी श्रीअनंत सातेरी, शांतादुर्गा आणि नारायणाच्या मंदिरांना भेट देतात आणि परतीच्या प्रवासात गावातील सर्व घरांना आशीर्वाद दिला जातो. या संपूर्ण मिरवणुकीच्यावेळी लोकं" हरी रे माझ्या पांडुरंगा, सख्याहरी माझ्या पांडुरंगा" असा जयघोष करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT