गोमन्तक डिजिटल टीम
फोंडा तालुक्यातील सवईवेरे या गावात चारही बाजूंनी पाण्याने व्यापलेले अनंत म्हणजेच भगवान विष्णूचे देऊळ प्रसिद्ध आहे.
आज अनंतचतुर्दशीच्या दिवशी इथे नारायणाला अभिषेक केला जातो. गंधाच्या पूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात आज आणि सख्या हरी (वार्षिक कालोत्सव) च्या वेळीच केळीच्या गब्यांनी मूर्तीला अलंकार चढवले जातात.
अनंतचतुर्दशीच्या निमित्ताने आज मंदिरात सकाळी विष्णुयागचे आणि दुपारी संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन केले गेले आहे.
संध्याकाळी भाविकांसाठी भजन-कीर्तनाचा कार्यक्रम असेल आणि त्यांनतर आरतीने उत्सवाची सांगता होईल.
या मंदिराची आख्यायिका सांगते की काही वर्षांपूर्वी एका नाविकाच्या होडीत ही मूर्ती सापडली होती. नाविकाने पाण्यात होडीचा समतोल साधण्यासाठी मूर्तीचा वापर केला होता.
सवाईवेरे गावातील साने कुटुंबीयांकडे या मंदिराच्या पूजेची जबाबदारी दिली गेली आहे. चारही बाजूंनी पाणी आणि मध्यभागी आदिशेषावरील भगवान विष्णूचे रूप नयनरम्य आहे.
निसर्गसंपन्न गोवा आणि निसर्गाच्या अगदीच जवळ असलेल्या जगत्पालक भगवान अनंताचे हे मंदिर नक्कीच भेट द्यावे असे आहे.