17th Pt Jitendra Abhisheki Music Festival At Ponda Goa: तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, कला अकादमी गोवा आणि राजीव कला मंदिर गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने 17वे पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन ७ व ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते रात्री ९.३० या कालावधीत, राजीव कला मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षी देण्यात येणारा पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ गायिका सुमेधा देसाई यांना त्यांच्या सांगीतिक योगदानासाठी देण्यात येणार असल्याची माहिती शौनक अभिषेकी व माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
महोत्सवात साथसंगत करण्यासाठी अनेक नामवंतचा सहभाग असणार आहे. सुधीर नायक, अनिश प्रधान, राया कोरगावकर, दयेश कोसबे, दुर्जय भौमिक, चिन्मय कोल्हटकर, तुलसीदास नावेलकर, दत्तराज सुलकर, दत्तराज म्हाळशी, प्रेमानंद अमोणकर, उत्पल सैनीकर, सुभाष फातर्पेकर, मयांक बेडेकर, दत्तराज शेट्ये, अमर मोपकर, रोहिदास परब, उदय कुलकर्णी, आशिष रागवानी, दीपक मराठे हे आपल्या साथीने कार्यक्रमात रंग भरतील.
पहिल्या दिवशी सकाळी ९.३० वाजता कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांसाठी निवेदक डॉ. अजय वैद्य, गोविंद भगत व सिद्धी उपाध्ये महोत्सवात नटलेले निवेदन कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहे.
गोव्याचे संतूर वादक नरेश मडगावकर व गायिका प्राची जठार हे कलाकार आपल्या गायनाने या महोत्सवामध्ये रंग भरतील.
ख्यातनाम सतार वादक शुभेंद्र राव, लोकप्रिय सरोद वादक राजन व सारंग कुलकर्णी आणि युवा बासरी वादक षड्ज गोडखिंडी यनाची प्रस्तुती या महोत्सवामध्ये होणार आहे. तसेच प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तिका नुपुर दैठणकर यांचा नृत्याविष्कार या महोत्सवामध्ये होणार आहे.
नामवंतांचा सहभाग
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे १६ कलाकार या महोत्सवामध्ये आपली कला सादर करणार आहेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका शुभा मुद्गल, सावनी शेंड्ये तसेच रोकीनी गुप्ता तसेच नामवंत गायक जयतीर्थ मेवुंडी व विनोद डिग्रजकर यांचे गायन होणार आहे.
युवा गायक अमोल निसाळ, सिद्धार्था बेलमन्नू, सुरंजन खंडाळकर आणि सत्यजित बेडेकर व युवा गायिका श्रुती देशपांडे यांचे गायन करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.