Panchajanya Sagar Manthan Sanvad Goa  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात होणार 'पांचजन्य'चा 'सागर मंथन संवाद'; 6 केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती; 24 डिसेंबरला दिवसभर कार्यक्रम

Akshay Nirmale

Goa Panchajanya Sagar Manthan Sanvad: गोव्यात रविवारी, 24 डिसेंबर रोजी 'पांचजन्य' चा सागर मंथन संवाद होणार आहे. या संवादासाठी 6 केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देखील उपस्थित राहतील. दक्षिण गोव्यातील नोव्हाटेल डोना सिल्व्हिया रिसॉर्ट येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

साबरमती संवादाच्या यशानंतर पांचजन्य ने हा सागर मंथन संवाद आयोजित केला आहे. पांचजन्यच्या फेसबुक आणि यूट्यूबवरही हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.

पांचजन्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियतकालिक आहे.

यावेळी या संवादाची टॅग लाइन गुड गव्हर्नन्स डायलॉग 2.0 अशी ठेवण्यात आली आहे. या संवाद कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंह,

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, भाजपचे उत्तर गोव्यातील खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, दूध उत्पादने निर्मिती कंपनी अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता आणि विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे सहभागी होणार आहेत.

सागर मंथन कार्यक्रमादरम्यान सर्व वक्ते विविध विषयांवर आपली मते मांडतील.

उल्लेखनीय म्हणजे, याआधी 2022 मध्येही गोव्यात पांचजन्यचा सागर मंथन कार्यक्रम झाला होता. नोव्होटेल गोवा डोना सिल्व्हिया रिसॉर्ट, केळशी येथे हा कार्यक्रम झाला होता.

मागील वेळी या कार्यक्रमात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी संबंधित घटना, चालीरीती आणि धोरणे, भावी भारत, कल्याणकारी योजना, सुशासनाचे विविध पैलू आणि जगभरातील भारतीय यावर चर्चा करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: गोव्यात पाण्याची मोठी चिंता! 30 सप्टेंबरपर्यंत 500 बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; जलसंवर्धनासाठी उचलली पावले

Ganeshotsav 2026: गोव्यात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू! अंगणात सडा, दाराशी रांगोळी अन् माटोळीची सजावट; बाप्पाच्या आगमनाने चैतन्याला उधाण

Horoscope 14 September 2026: गणपती बाप्पा मोरया...! बाप्पाच्या कृपावर्षावानं 'या' राशी होणार मालामाल; कुबेराचा खजिना उघडणार

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

SCROLL FOR NEXT