Water Scarcity Dainik Gomantak
गोवा

Sacorda Water Scarcity : विहिरी आटल्याने साकोर्डा येथील पाणी प्रकल्प केला बंद

Sacorda Water Scarcity : सरपंचांनी घेतली बैठक : दोन तास पाणी

गोमन्तक डिजिटल टीम

Sacorda Water Scarcity

तांबडीसुर्ला, मधलावाडा-साकोर्डा येथील विहिरीचे पाणी आटायला लागल्याने येथील १ एमएलडी पाणी प्रकल्प बंद करण्यात आला आहे.शनिवारी सकाळी ग्रामस्थांनी याबाबत दबाव आणल्यावर कनिष्ठ अभियंत्याने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, परिसरात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली असून यावर तोडगा काढण्यासाठी सरपंच प्रिया खांडेपारकर यांनी गुरुवारी संध्याकाळी मधलावाडा ग्रामस्थांची येथील मांडावर विशेष बैठक घेतली.

पूर्वी सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत लोकांना पाणी सोडले जात होते. यात कपात करून सकाळी ७ वाजता आळीपाळीने पंप सुरू करून दिवसातून फक्त २ तास पाणी सुर्ला, मधलावाडा व बट्टर गावाला सोडण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. बट्टर गावात दोन तास पाणी पुरवठा करून लोकांना पाणी अपुरे पडत असेल तर त्या गावात टँकरची अतिरिक्त सोय केली जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, मेस्तवाडा, तयडे व धारगे गावातील पाणी पुरवठा या कालावधीत बंद करण्यात येणार आहे. या गावातील लोकांना टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जाईल, असे सरपंच प्रिया खांडेपारकर यांनी सांगितले.

पानसी येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतून बोळकर्णे व बाराभूमी विद्यालय परिसरातील लोकांना निर्धारित वेळेत पाणी पुरवठा करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलची भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT