Goa Crime News: समाज कल्याण खात्याचे मंत्री फळदेसाईंना धमकी, 20 कोटी खंडणीची मागणी; संशयिताला जामीन

Goa Crime News: संशयितावरोधात गुन्हा नोंद करुन, रिवण येथील मिथील देसाई याला अटक केली.
Minister Subhash Phaldesai
Minister Subhash PhaldesaiDainik Gomantak

Goa Crime News

राज्याचे समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांना धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी मिथील देसाई याला अटक केली. पण, वास्को न्यायालयाकडून त्याला जामीन देखील देण्यात आला आहे.

सोशल मिडियावर बदनामी आणि धमकी दिल्याप्रकरणी फळदेसाई यांनी सांगे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

संशयित मिथील देसाई याने मंत्री फळदेसाई यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मिडियावर करत 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली. तसेच, फळदेसाई यांची पत्नी आणि मुलीविरोधात असभ्य भाषा वापरली. याप्रकरणी फळदेसाई यांनी सांगे पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काळ तक्रारीची दखल घेत संशयितावरोधात गुन्हा नोंद करुन, रिवण येथील मिथील देसाई याला अटक केली. दरम्यान, त्याला वास्को प्रथमवर्ग न्यायालयासमोर हजर केले असता, जामीन देण्यात आला आहे.

Minister Subhash Phaldesai
Electrocution At Miramar: वीज अंगावर पडून मिरामार येथे केरळच्या व्यक्तीचा मृत्यू; सुदैवाने पत्नी, मुले बचावली

फळदेसाई यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन संशयित देसाई विरोधात भादसंच्या कलम 384, 388, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. संशयित देसाईला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला तसेच, त्यातून धमकीवजा खंडणीची मागणी करणारा मेजेस मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, पोलिस कोठडीसाठी देसाईला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला वीस हजार रुपयांची हमी आणि इतर अटीशर्तींवर जामीन देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com