Illegal Tree Cutting In Sacorda, Dharbandora Dainik Gomantak
गोवा

Illegal Tree Cutting: साकोर्डात खैरच नव्हे सागवान झाडांचीही कत्तल; ग्रामस्थांकडून माहिती

Ponda News : वन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून टोळीला मिळतेय सहकार्य

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Tree Cutting In Sacorda, Dharbandora

धारबांदोडा तालुक्यात येणाऱ्या साकोर्डा भागात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खैराच्या झाडांची कत्तल होत आहे.

आता खैराच्या झाडांबरोबर मोठ्या सागवानाच्या झाडांचीही बिनधास्तपणे कत्तल होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

साकोर्डा भागातील झाडांची कत्तल करणाऱ्या टोळीला वन खात्याचे काही कर्मचारी सहकार्य करीत असल्याने कुंपणच शेत खाते, अशी स्थिती या परिसरात निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात वाळपई वन खात्याने गुळेली व केरी-सत्तरी येथे कारवाई करून दोन वाहने, झाडे कापण्याचे साहित्य आणि खैराचे लाकूड जप्त केले होते.

तसेच एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत. याचे कनेक्शन साकोर्डा येथे असून म्होरक्याही याच भागाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुळे वन विभागाने कारवाई करून कत्तल केलेल्या खैराचे लाकूड जप्त केले असून साकोर्डा वन विभागच्या कार्यालयाजवळ ते लाकूड ठेवले आहे.

खैराच्या लाकडासह सागवानाच्या झाडांची परवाने न घेताच बेकायदेशीरपणे साकोर्डा भागात सक्रिय असलेल्या त्याच टोळीकडून तस्करी केली जात असल्याचा संशय स्थानिक लोकांना आहे.

परंतु त्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराचे राजकीय नेत्याकडे जवळचे संबंध असल्याने आजपर्यंत त्याला कुणीच पकडू शकले नाही. तसेच वन खात्याचे काही कर्मचारीही तस्करी करण्यात त्यांना सहकार्य करीत असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

‘आरएफओ’ना सल्ला

या भागात मोठ्या प्रमाणात खैरीची तस्करी होत असल्याचे वारंवार वर्तमानपत्रात येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे.

त्यानुसार सर्व ‘आरएफओ’ना पणजी येथे बोलावून त्यांना योग्य सल्ला दिलेला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

PM Surya Ghar Scheme:'पीएम सूर्य घर मुफ्‍त बिजली'च्या जागृतीला चालना, उत्तर गोवा जिल्हा समन्वय समितीच्‍या बैठकीत निर्णय

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT