Sacorda Pumphouse Leakage Dainik Gomantak
गोवा

Sacorda Pumphouse: साकोर्ड्यात हजारो लिटर पाण्याची नासाडी! पंपहाऊस गळतीबाबत चालढकल; पत्रकारांच्या भेटीनंतर दुरूस्ती

Sacorda Pumphouse Leakage: डोंगरवाडा-साकोर्डा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पंप हाऊसमध्ये जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे दिवसाला हजारो लिटर पाण्याची नासाडी सुरू होती.

Sameer Panditrao

तांबडीसुर्ला: डोंगरवाडा-साकोर्डा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पंप हाऊसमध्ये जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे दिवसाला हजारो लिटर पाण्याची नासाडी सुरू होती. मात्र, धारबांदोडा पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देऊनही ते दुरुस्त करण्याबाबत चालढकल करत असल्याने पाण्याची प्रचंड नासाडी झाली होती. स्थानिक पत्रकारांनी पंप हाऊसला भेट देऊन तेथील संपूर्ण पाहणी केली. हे कळताच धास्तावलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जलवाहिनी दुरूस्ती केली.

साकोर्डा पंचायतीने सुमारे पंधरावर्षांपूर्वी विहिर बांधली होती.त्या विहिरीला सार्वजनिक बांधकाम खात्याने पंप हाऊस बांधून विहिरीला जलवाहिनी जोडून डोंगरवाडा गावातील लोकांना नळांची जोडणी केली होती. पंप हाऊस , विहिरीचे योग्य प्रकारे साफसफाई नियोजन न केल्याने या ठिकाणी भयानक स्थिती निर्माण झाली आहे. पंप हाऊसच्या छप्पराचे सिमेंटचे पत्रे फुटलेले असून पावसाळ्यात गळती होण्याची दाच शक्यता असून अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पाणी विभागाने विहिरीची स्वच्छता ठेवलेली नाही.विहिरीला जाळी न बसवल्याने पाने,कचरा व सुकलेले झाडांच्या फांद्या पाण्यात पडून कुजलेली असतात. तेच पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. पंपहाऊस मधील जलवाहिनी दुरुस्त करण्यापूर्वी गळतीचे पाणी जमिनीत मुरुन विहिरीत जात होते. एकंदरीत या प्रकल्पाकडे अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे लोक बोलत आहेत. विहिरीला पाण्याचा साठा कमी असल्याने पंप केवळ १ तास १० मिनिटे चालतो. परिणामी येथील लोकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते.

कुंभारवाडा येथे धारबांदोडा जिल्हा पंचायत निधीतून विहिर बांधली होती. तेथील पंप हाऊसमध्ये गळती सुरु असल्याचे कनिष्ठ अभियंत्यांना माहिती असूनही ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.

‘व्हॉल्व’ अभावी रखडली दुरुस्ती

येथे एका व्हॉल्वची ( झडप) गरज आहे. धारबांदोडा कार्यालयात व्हॉल्व उपलब्ध नसल्याने जलवाहिनी दुरुस्तीचे काम लांबणीवर पडल्याचे समजते. धारबांदोडा कनिष्ठ अभियंता पंप ऑपरेटरना व्हॉल्व विकत आणायला सागतात. ते आणतात, पण बिल लवकर चुकते करत नसतात.त्यांना अनेक महिने प्रतीक्षा करावी लागते. हे अधिकाऱ्यांना लांच्छनास्पद आहे. येथील विहिरीला जाळीची गरज आहे या विहिरीचा ४ तास पंप चालतो.त्यानंतर उधळशे येथील जलपुरवठा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT