Sachi Sawant Dainik Gomantak
गोवा

KIIT NanhiPari Little Miss India 2022 : पेडण्यातील युवतीने पटकावले द्वितीय उपविजेतेपद

Rajat Sawant

किट नन्हीपरी लिटील मिस इंडिया 2022 ही स्पर्धा नुकतीच गुरुवारी भुवनेश्वर ओडिसा येथे पार पडली. या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये पेडण्यातील गोमंतकीय मुलीने द्वितीय उपविजेतेपद पटकावले आहे. तर सिटी-गर्ल अयाना राउत्रे हिने किट नन्हीपरी लिटील मिस इंडिया 2022चा (KIIT NanhiPari 2022) मुकुट पटकावला.

19 ऑडिशन्समधून 15-17 वर्षे वयोगटातील 28 स्पर्धकांना हायब्रीड मोडद्वारे देशभरात झालेल्या प्रादेशिक ऑडिशन्समधून उपांत्य फेरीसाठी निवडण्यात आले. ही स्पर्धा गुरुवारी ओडिसा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पार पडली. या सौंदर्य स्पर्धेची ही 20 वी आवृत्ती आहे.

पेडणे तालुक्यातील साची सावंंत या किशोरवयीन युवतीने किट नन्हीपरी लिटील मिस इंडिया 2022 या स्पर्धेत द्वितीय उपविजेतेपद पटकावले आहे. तसेच मिस मोनालिसा पुरस्कार साची राजेश सावंत हीने पटकावला आहे. ग्रँड फिनालेमध्ये मेघालयच्या रायशा सहनवाज आणि गोव्याच्या साची राजेश सावंत यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेतेपद पटकावले. पहिल्या तिघांना अनुक्रमे 3 लाख, १ लाख आणि 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक तसेच चांदीचा मुकुट आणि प्रमाणपत्र, ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी तीने आपल्या यशाचे श्रेय तिच्या आईला दिले.

दरम्यान, पेडणे तालुक्यात कला भवनाची गरज आहे अशी खंत तिने यावेळी बोलून दाखवली. कला भवन झाल्यास पेडण्यातील कलाकारांना उभारी मिळेल. जिद्द असेल तर येथील स्थानिक कलाकार नक्कीच पुढे येतील. अशी जिद्द दाखवणारा कोणीतरी पुढे यायला हवा यासाठी पेडणेकेरांनीच प्रयत्न करायला हवेत. 18 वर्षे पुर्ण झाल्यावर मिस इंडिया स्पर्धेमध्ये सहभागी होणाच्या प्रयत्न करणार आहे असे तिने यावेळी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT