Goa: लुटणाऱ्या ‘बस ऑपरेटर्स’ना रोखा; ‘सुराज्य अभियान’ची मागणी

नववर्ष साजरे करून पर्यटक त्यांच्या राज्यांत परतीच्या प्रवासाला जात आहेत. मात्र, ‘बस ऑपरेटर्स’ त्यांच्याकडून नियमित दरापेक्षा अव्वाच्या सव्वा अधिक दर आकारत आहेत.
Goa
Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: नाताळ आणि नववर्ष साजरे करून पर्यटक त्यांच्या राज्यांत परतीच्या प्रवासाला जात आहेत. मात्र, ‘बस ऑपरेटर्स’ त्यांच्याकडून नियमित दरापेक्षा अव्वाच्या सव्वा अधिक दर आकारत आहेत. प्रवाशांची ही लूट थांबवण्यासाठी ‘बस ऑपरेटर्स’च्या दर आकारणीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचा एक विभाग असलेल्या ‘सुराज्य अभियान’च्या शिष्टमंडळाने केली.

मग वाहतूक उपसंचालक फ्रान्सिस्को वाझ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या शिष्टमंडळात प्रतिभा हळदणकर, सुशांत दळवी, नवनाथ नाईक, प्रमोद तुयेकर व दिलीप शेट्ये यांचा समावेश होता.

निवेदनात नमूद केले आहे,की महाराष्ट्र सरकारने ‘जी.आर्.’ प्रसिद्ध करून बस ऑपरेटर्सच्या अधिकाधिक तिकीटदर आकारणीवर निर्बंध घातलेले आहेत. यानुसार खासगी बस ऑपरेटर्सना शासनाच्या तिकीट दरापेक्षा अधिकाधिक दीडपट तिकीट आकारणी करता येते. गोवा सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून याच धर्तीवर अधिकाधिक बस तिकीट दर आकारणीवर निर्बंध घालावेत.

Goa
Salcete: सिकेटी पुलाला स्थानिकांचा मोठा विरोध; बांधकाममंत्री मात्र निर्णायावर ठाम

खासगी ‘बस ऑपरेटर्स’ना हे दर लागू करावेत, दरवाढीसंबंधी प्रश्न उद्भवल्यास तक्रार नोंदवण्यासाठी ‘हेल्प लाईन’ क्रमांक उपलब्ध करावा. प्रवाशांना अतिरिक्त दर आकारून लुटणाऱ्या खासगी बस ऑपरेटर्स आणि ‘ऑनलाईन’ तिकीट देणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. या निवेदनाची प्रत वाहतूक मंत्र्यांनाही पाठवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com