पणजी: गोव्याच्या सागरी क्षेत्रातील प्रगतीची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात असून, यावेळी रशियाकडून प्रशंसनीय प्रतिसाद मिळाला आहे. रशियाचे राष्ट्रपती साहाय्यक आणि त्या देशाच्या सागरी मंडळाचे अध्यक्ष निकोलाई पत्रुशेव यांनी बुधवारी गोव्यात भेट देत विकसित होत असलेल्या विविध सागरी सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
पत्रुशेव यांनी मुरगाव बंदर, गोवा शिपयार्ड आणि राष्ट्रीय ध्रुवीय व महासागर संशोधन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी रशिया–भारत सहकार्याच्या विविध प्रकल्पांवर चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही देश मिळून स्वतःची नौका उभारणी अधिक बळकट करू शकतात.
परस्परांतील सागरी सहकार्य वाढवू शकतात, निर्बंधांना न जुमानणारी सागरी वाहतूक व्यवस्था निर्माण करू शकतात, तसेच सागरी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देऊ शकतात, असे पत्रुशेव यांनी या भेटीदरम्यान नमूद केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मूळ संशोधन आणि अनुप्रयुक्त संशोधन या दोन्ही क्षेत्रांत उंच दर्जाच्या वैज्ञानिक पिढ्या घडविण्यासाठी रशिया आणि भारत विशेष लक्ष देणार आहेत. तसेच द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासोबतच बहुपक्षीय मंचांचा, विशेषतः ब्रिक्सचा, सक्रिय वापर करणे आवश्यक आहे. या संघटनेला सक्षम सागरी दिशा मिळण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी या चर्चेदरम्यान नमूद केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.