Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Cristiano Ronaldo AFC Champions League: नेहरू स्टेडियम, फातोर्डा येथे बुधवारी होणाऱ्या एएफसी चॅम्पियन्स लीग ग्रुप टू सामन्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो येणार की नाही याबाबत चर्चा सुरु होती.
Cristiano Ronaldo Goa Visit
Cristiano Ronaldo Goa VisitDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: नेहरू स्टेडियम, फातोर्डा येथे बुधवारी होणाऱ्या एएफसी चॅम्पियन्स लीग ग्रुप टू सामन्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो येणार की नाही याबाबत चर्चा सुरु होती. २१ ऑक्टोबर रोजी अल नासर संघ गोव्यात पोहोचला आहे. पण या टीमसोबत रोनाल्डो दिसला नाही. त्यामुळेएएफसी चॅम्पियन्स सामन्यात रोनाल्डो खेळणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

नुकतेच गोवा सरकारने आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या सामान्यसंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. रोनाल्डो गोव्यात आल्यास तो आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण असेल असे त्यांनी जाहीर केले होते. प्रशासनानेही सर्व प्रकारची सुरक्षा आणि व्यवस्था पुरवण्याची तयारी केली होती.

रोनाल्डो या आधीही अल नासरच्या दोन मॅचेसमध्ये अनुपस्थित राहिला होता. जर तो गोव्यात खेळला नाही तर रोनाल्डो त्याच्या दोन वर्षांच्या कराराच्या नूतनीकरणानंतर पहिल्यादांच सामन्याला गैरहजर राहील. त्याच्या कराराची किंमत दरवर्षी सुमारे 2,000 कोटी (सुमारे $700 दशलक्ष) आहे. या करारात त्याला खासगी जेट, १६ सदस्यांची वैयक्तिक टीम आणि साऊदी अरबच्या बाहेर मॅच खेळायची की नाही याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.

रोनाल्डोचा मुख्य फोकस 2026 FIFA विश्वचषक आहे, जिथे त्याने पोर्तुगालसाठी सहावा विश्वचषक खेळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तो वर्ल्ड कप क्वालिफायिंग इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा (41 गोल) खेळाडू आहे.

Cristiano Ronaldo Goa Visit
Ronaldo Goa Visit: रोनाल्डो गोव्यात फुटबॉल खेळणार? प्रशासन सज्ज; 22 ऑक्टोबर रोजी होणार सामना

रोनाल्डोने गोव्यातील सामन्याला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असेल तर तो विश्वचषक आधी फिटनेस टिकवण्यासाठी आणि लोड व्यवस्थापनासाठी घेतला असेल. पोर्तुगाल नोव्हेंबरमध्ये आयर्लंड आणि आर्मेनिया विरुद्ध अंतिम क्वालिफायर सामना खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com