Rush for shopping nonveg in Ponda Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात मासे, चिकन खरेदीसाठी गर्दी!

दर चढेच : ग्राहकांनी साजरा केला श्रावणापूर्वीचा रविवार

दैनिक गोमन्तक

फोंडा : श्रावण महिना तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने सुट्टीच्या दिवशी काल रविवारी फोंड्यात चिकन, मटण व मासे खरेदीसाठी तोबा गर्दी उसळली होती. फोंडा तसेच तालुक्यातील अन्य मासळी मार्केटमध्ये हीच स्थिती होती.

सर्वांत जास्त गर्दी चिकन स्टॉल्समध्ये दिसून आली. चिकन साधारण 180 रुपये किलो; नेट चिकन 220 रुपये किलो, मटण 1 हजार रुपये किलो; तर गावठी कोंबडी 600 ते 700 रुपये नग याप्रमाणे विकली गेली. माशांचे दरही चढेच होते. सुंगटे आकारानुसार 300 रुपये ते 600 रुपये किलो या भावाने विकली गेली. गावठी माशांनाही चांगले दर आले होते. एकंदर फोंड्यातील विविध मासळी बाजारांत पहाटेच माशांची आवक झाली होती.

शाकाहाराला प्राधान्य

राज्यात चिकन, मटणाची सर्वाधिक विक्री ही श्रावणापूर्वीच असते, असे निदर्शनास आले आहे. बरेच लोक श्रावणात शाकाहारी राहणे पसंत करत असल्याने श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी शेवटच्या रविवारी किंवा बुधवारी चिकन, मटणाचा बेत केलेला असतो. त्यामुळे त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते, असे चिकन विक्रेत्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT