म्हापशात अग्नितांडव; गोवेकर बेकरीला भीषण आग

रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने बेकरीमध्ये कुणीही नव्हतं. मात्र अचानक लागलेल्या आगीत बेकरी जळून खाक झाली.
Fire in Govekar Bakery Mapusa
Fire in Govekar Bakery Mapusa Dainik Gomantak
Published on
Updated on

योगेश मिराशी

म्हापसा : म्हापशात रविवारी रात्री उशिरा अग्नितांडव पाहायला मिळालं. मिलाग्रीस चर्चशेजारीच असलेल्या या बेकरीला रात्री आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. या आगीत बेकरी पूर्णपणे जळून खाक झाली असून मोठं नुकसान झालं आहे.

म्हापशात मिलाग्रीस चर्चजवळ ही गोवेकर बेकरी आहे. रविवारी रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी अग्निशनम दलाला आग लागल्याची माहिती देणारा कॉल आला. तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या बचावकार्यासाठी रवाना झाल्या. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने बेकरीमध्ये कुणीही नव्हतं. मात्र अचानक लागलेल्या आगीत बेकरी जळून खाक झाली. आगीमध्ये बेकरीचं अंदाजे 2 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

Fire in Govekar Bakery Mapusa
Smriti Irani : स्मृती इराणींच्या मुलीचं ‘ते’ रेस्टॉरंट बेकायदेशीरच

दरम्यान गोवेकर बेकरीला लागलेल्या आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. खोर्लीत राहणाऱ्या दत्ताराम गोवेकर यांची ही बेकरी असून सुमारे 2 लाखांचं नुकसान झालं आहे. तर 50 हजारांचं सामान वाचवण्यात यश आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com