Car Fire in Margao  Dainik Gomantak
गोवा

Margao : मडगावात बर्निंग कारचा थरार; भरधाव गाडीने घेतला पेट, सुदैवाने चालक बचावला

कारचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

सुशांत कुंकळयेकर

Running car catches fire in Margao : चालत्या गाड्या पेटण्याचे गोव्यात हल्ली बरेच प्रकार घडले आहेत. त्यातच भर म्हणून आज सकाळी मडगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणखी एक टाटा इंडिका गाडीने पेट घेतला. आगीत ही गाडी संपूर्ण जळून खाक झाली. सुदैवाने कारचालकाने प्रसंगावधान दाखवून गाडी रस्त्याच्या बाजूला नेऊन पार्क केल्याने त्याने स्वतःचा जीव वाचवण्यासोबतच इतरांनाही आगीच्या धोक्यापासून वाचवलं.

हा प्रकार मडगाव पणजी मुख्य रस्त्यावर घडला. या रस्त्यावर नेहमीच वाहतूक जास्त असते अशा परिस्थितीत गाडीतून धूर येऊ लागल्याने गाडी चालवत असलेल्या आशुतोष सिंग याने त्वरित आपली गाडी रस्त्याच्या बाजूला घेऊन रहदारीपासून ती दूर नेली. एवढ्यात गाडीने पूर्ण पेट घेतला. चालकाने झटपट बाहेर येत आपला जीव वाचविला.

सदर चालक पणजीहून दक्षिण गोव्यात येत असताना ही दुर्घटना घडली. ही आग नेमकी कशामुळे लागली ते कळू शकले नाही. नंतर अग्निशमन दलाने ती आटोक्यात आणली. आगीत कार जळून खाक झाली असली तरीही चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोकण रेल्वेची मोठी कारवाई! 2025 मध्ये विनातिकीट प्रवाशांकडून 20.27 कोटींचा दंड वसूल

Plane Crash: ओडिशात विमान अपघात! राउरकेला-भुवनेश्वर चार्टर्ड विमान कोसळलं; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, 6 जखमी

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT