Rumdamol Dovorlim Road  Dainik Gomantak
गोवा

Rumdamol: 'रस्ते दुरुस्त केले, पण निकृष्ट दर्जाचे'! रुमडामळ पंचसदस्याची तक्रार; कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्याची होतेय मागणी

Rumdamol Dovorlim Road: सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी यात लक्ष घालावे व ज्या कंत्राटदाराने निकृष्ट काम केले आहे त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी वळवईकर यांनी केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: सांडपाणी पाईपलाईन, गॅस पाईपलाईन व भूमिगत वीज वाहिन्यांसाठी रुमडामळ-दवर्ली व परिसरातील रस्ते खणले होते. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला. गेल्या दीड वर्षापासून येथील नागरिक दुरुस्तीची मागणी करीत होते. अखेरीस रस्त्याची दुरुस्ती केली गेली; पण हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे वाहनचालकांबरोबर पादचाऱ्यांचेही हाल होत आहेत. ही बाब स्थानिक पंचसदस्य विनायक वळवईकर यांनी उपस्थित केली.

विकासकामांसाठी रस्ते खणले; पण ते लगेच दुरुस्त करायला हवे होते. ते केले नाहीत. जेव्हा केले तेव्हा काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जे रस्ते दुरुस्त केले, ते ओबडधोबड झाले आहेत. वाहन चालविणे कठीण होते. वाहनचालकांना दुखापत होत आहे.

रस्ता सरळ करण्यासाठी रोलरऐवजी जेसीबीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याची पातळी खाली गेली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी यात लक्ष घालावे व ज्या कंत्राटदाराने निकृष्ट काम केले आहे त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी वळवईकर यांनी केली आहे.

दुरुस्ती गरजेची!

काही दिवसांपूर्वी पावसाळ्यात एका लहान मुलाने रस्त्यावरील पाण्यात हात टाकला. तिथेच उघड्या वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने त्याला शॉक लागला. या वीजवाहिन्यांच्या कामाचीही दुरुस्ती होणे आवश्यक असल्याचे वळवईकर यांनी लक्षात आणून दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT