Goa Road Repair: '15 दिवसांत रस्‍त्‍यावर एकही खड्डा दिसणार नाही', मंत्री कामत यांचे आश्वासन; कंत्राटदारांना निर्देश दिल्याचे स्पष्टीकरण

Digambar Kamat Goa Road: आता पाऊस नसल्‍यामुळे पुढील पंधरा दिवसांत सर्वच मतदारसंघांतील रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजवण्‍याचे निर्देश आपण कंत्राटदारांना दिलेले आहेत, असे कामत यांनी सांगितले.
Goa Mining Scam
Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील सर्वच मतदारसंघांतील रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजवण्‍याचे निर्देश आपण कंत्राटदारांना दिलेले आहेत. त्‍यानुसार कामही सुरू झालेले असल्‍याने पुढील पंधरा दिवसांत एकाही रस्‍त्‍यावर खड्डा दिसणार नाही, असे सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे (पीडब्‍ल्‍यूडी) मंत्री दिगंबर कामत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजवण्‍याचे निर्देश आपण काही महिन्‍यांपूर्वीच कंत्राटदारांना दिलेले होते. परंतु, मध्‍यंतरीच्‍या काळात सातत्‍याने पाऊस पडत राहिला. त्‍यामुळे रस्‍त्‍यांची कामे करता आली नाहीत. आता पाऊस नसल्‍यामुळे पुढील पंधरा दिवसांत सर्वच मतदारसंघांतील रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजवण्‍याचे निर्देश आपण कंत्राटदारांना दिलेले आहेत, असे कामत यांनी सांगितले.

Goa Mining Scam
Goa Road Closure: वास्को वाहतुकीत मोठे बदल! रेल्वे अंडरब्रिज 6 दिवसांसाठी बंद, पोलिसांनी दिलाय पर्यायी मार्ग; Watch Video

भू-मापन प्रस्तावावर फेरेरा यांची टीका

संपूर्ण गोव्यात भू-मापन करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या प्रस्तावावर आमदार ॲड. कार्लुस फरेरा यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने नुकतीच अधिसूचित केलेली ‘गोवा जिओस्पेशल नॉलेज बेस्ड लँड सर्व्हे ऑफ अर्बन हॅबिटेशन रुल्स, २०२५’ ही नियमावली गोमंतकीयांची घरे-जमीन बळकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

Goa Mining Scam
Mapusa Bad Roads: ‘रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांत रस्ते?’ म्‍हापशात रस्‍त्‍यांना तळ्‍याचे स्‍वरूप; अर्धवट केबलिंगचा फटका

राज्य सरकारने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी ही नियमावली राजपत्रात प्रसिद्ध केली. यानुसार सर्वेक्षण विभागास संपूर्ण भू-मापन करून त्याची डिजिटल नोंद तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मला सर्वेक्षणाला विरोध नाही; पण ही संपूर्ण प्रक्रिया मागच्या दाराने मालमत्ता काबीज करण्यासाठी राबवली जात असल्याची शंका निर्माण होते, असे फरेरा म्हणाले. नियम ३ नुसार भूमापन संचालकांना लोकांना सर्वेक्षणाची नोटीस देण्याचे अधिकार मिळत आहेत. व्यक्तींनी सर्वेक्षण अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती देणे बंधनकारक असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com