Goa Mining Case Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Case: उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ

Goa Mining Case: मयेत खनिज वाहतुकीवेळी नियम धाब्यावर

दैनिक गोमन्तक

Goa Mining Case: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद असलेली खनिज वाहतूक आज मयेतून सुरू झाली असली कोर्टाच्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून आले आहे. मात्र, ग्रामस्थांनी प्रत्येक ट्रक अडवून वाहतूक परवान्याची तपासणी करणे सुरू केले आहे.

मुळाक खाजन शेतकरी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागितल्यानंतर या वाहतुकीसाठी सशर्त परवानगी दिली होती. धूळ प्रदूषण मापन यंत्रणा बसवावी, सीसीटीव्ही बसवावेत आणि दिवसाला केवळ 50 ट्रक फेऱ्यांतून उर्वरित 5 हजार 900 मेट्रीक टन खनिजाचीच वाहतूक केली जावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

त्याचे पालन करताना धूळ प्रदूषण मापन यंत्रणा बसवली असली तरी त्यात नोंद होणारी आकडेवारी पाहण्यासाठी कोणतीही सोय केलेली नाही. एक सीसीटीव्ही कॅमेरा पंचायतीच्या जुन्या इमारतीवर बसवणे आवश्यक असताना तो ४० मीटर अंतरावरील नव्या इमारतीवर बसवला आहे. त्यामुळे पैरा ते डिचोली या रस्त्यावर वाहतूक करणारे ट्रक कॅमेऱ्यात दिसत नाहीत.

न्यायालयाच्या आदेशानुसार खनिजवाहू ट्रकातील खनिज माती ही ताडपत्रीने आच्छादणे आवश्यक आहे. तसे केले जात नसून हिरव्या जाळीचे कापड त्या ट्रकांतील खनिजावर घालण्यात येत आहे.

परवान्यांची तपासणी

सध्या खनिज भरून येणाऱ्या ट्रकांच्या वाहतूक परवान्यांची तपासणी करणे ग्रामस्थांनी सुरू केले आहे. ट्रक किती फेऱ्या मारतात, हेही पाहिले जात आहे. १२ दिवसांत ही खनिज वाहतूक पूर्ण होणे अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT