Lokotsav 2024: पणजी येथील लोकोत्सवमध्ये हस्तकलांचे शेकडो स्टॉल

Lokotsav 2024: कला अकादमीच्या आवारात भरलेल्या लोकोत्सवामध्ये हस्तकलांचे शेकडो स्टॉल मांडले गेले आहेत, पण माझ्या डोळ्यांना कुठल्या स्टॉलचे जर आकर्षण वाटले असेल तर ते गोवा राज्याच्या ‘डिपार्टमेंट ऑफ हॅंडीक्राफ्ट, टेक्स्टाईल अँड कॉइर’ या स्टॉलचे.
Dainik Gomantak
Dainik Gomantak Lokotsav 2024:
Published on
Updated on

Lokotsav 2024: कला अकादमीच्या आवारात भरलेल्या लोकोत्सवामध्ये हस्तकलांचे शेकडो स्टॉल मांडले गेले आहेत, पण माझ्या डोळ्यांना कुठल्या स्टॉलचे जर आकर्षण वाटले असेल तर ते गोवा राज्याच्या ‘डिपार्टमेंट ऑफ हॅंडीक्राफ्ट, टेक्स्टाईल अँड कॉइर’ या स्टॉलचे. तिथे तयार होणारे कुणबी वस्त्र जगापर्यंत पोहोचवण्याची खूप गरज आहे.

या स्टॉलवर काही स्त्रिया हे वस्त्र विणताना दिसतात. या स्टॉलवर उपलब्ध असणाऱ्या कुणबी साड्यांच्या किमतीदेखील अतिशय वाजवी आहेत. 1000 ते 3000 रुपये अशी या साड्यांची किंमत आहे.

कुणबी साड्यांच्या निर्मितीक्षेत्रात नवे लोक आता उतरताना आज आपण पाहतो आहोत. या लोकांनी अशा साड्यांची किंमत फार अधिक करून ठेवून त्याला धंदेवाईक रूपही दिले आहे. पण तो पैसा योग्य प्रमाणात विणकारांकडे पोचतानाही दिसत नाही म्हणून त्या संबंधाने आम्हा गोमंतकीयांनाच काहीतरी करावे लागेल.

Dainik Gomantak
Divya Rane: आरक्षणामुळे देशातील नारीशक्तीला न्याय!

कुणबी वस्त्र हे गोव्याचे सर्वात जुने असे वस्त्र आहे. कुणबी साडी विणणाऱ्या इथल्या महिलांबरोबर मी बोललो. त्या साऱ्या उत्साही आहेत व त्यांचा तो उत्साह टिकून राहायला हवा.

गोव्यात जात, धर्माचे फार प्रस्थ आहे आणि त्यातून अनेक गैरसमजुतीही जन्माला आल्या आहेत. अनेकांना आपल्या पारंपरिक कलेबद्दल त्यातून न्यूनगंडही निर्माण झालेला दिसतो. मी अलीकडे आयोजित केलेल्या एका महोत्सवात प्रत्यक्ष कुणबी जमातीतील महिला कुणबी साडी नेसायला संकोचत होत्या असे माझ्या अनुभवाला आले.

Dainik Gomantak
Goa Entertainment: गोव्यातील ‘नोमोझो’ म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच!

खरे तर त्यांना आपले पारंपरिक वस्त्र नेताना अभिमान वाटायला हवा होता. त्यांना जर तसा वाटत नसेल तर तो अभिमान त्यांना मिळवून देण्याच्या दिशेने आम्हाला काम करावे लागेल.

आज मार्केटिंगमध्ये प्रवीण असणारे लोक या साडीला ग्लॅमर देऊन फायदा मिळवत असताना आपण पाहतो. अशावेळी तळागाळातील लोकांबरोबर काम करून त्यांना या उद्योगात स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवा. एक सहा वारी कुणबी साडी विणण्यासाठी किमान दहा दिवस लागतात. त्यांच्या त्या श्रमाला योग्य मूल्य प्राप्त करून देण्याच्या दिशेने आपले काम असायला हवे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com