Goa Politics: न झालेल्या कार्यक्रमांसाठी दिले 26 लाखांचे अनुदान! सभापतींचा मंत्री गावडेंवर आरोप

Goa Politics: कला अकादमी संकुलाच्या निकृष्ट दर्जाच्या नूतनीकरणामुळे वादात सापडलेले कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: सभापती रमेश तवडकर यांनी आज कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्यावर खोतीगावच्या एका वाड्यावर न झालेल्या कार्यक्रमांसाठी २६ लाख रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केल्याचा आरोप केला आहे.

कला अकादमी संकुलाच्या निकृष्ट दर्जाच्या नूतनीकरणामुळे वादात सापडलेले कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. कला अकादमीचा विषय आहेच; पण त्या जोडीला विधानसभेचे मंत्र्यांचा हेतू स्वच्छ नाही, असेही तवडकर म्हणाले.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांच्यासह अनेकांनी गावडे यांची निःपक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी त्यांनी पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी करणे सुरू केले आहे. कला अकादमी संकुलातील खुल्या सभागृहाचे छत कोसळले.

नूतनीकरण केलेल्या कला अकादमी संकुलाला गळती लागल्याची छायाचित्रे, चित्रफिती समोर आल्या. त्याआधी निविदा न मागवताच हे काम केल्याचा आरोप गावडे यांच्यावर होत होता. आता निकृष्ट कामामुळे गावडे यांनी पदावरून जावे,

Govind Gaude
Lokotsav 2024: पणजी येथील लोकोत्सवमध्ये हस्तकलांचे शेकडो स्टॉल

अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच हे नवे प्रकरण खुद्द सभापतींनीच उघड केले. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापतींनी आरोपांचे क्षेपणास्त्र गावडेंवर डागले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना बोलावून मी या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे आणि पक्षीय पातळीवरही हा विषय उपस्थित करणार असल्याचे सांगून तवडकर यांनी गावडे यांना पदावरून हटविल्याशिवाय गप्प बसणार नाही.

असे सुचविले आहे. या दोन्ही नेत्यांत काही महिन्यांपूर्वी दिलजमाई झाल्याचे वृत्त ‘गोमन्तक’ने दिले होते. त्यावेळी दोघांकडूनही वाद मिटल्याचे ‘गोमन्तक’शी बोलताना मान्य केले होते. मात्र, आता तो वाद पुन्हा उफाळून आल्याचे दिसून येते.

हा विषय तवडकर यांचे मूळ घर असलेल्या खोतीगाव परिसरातील आहे. तेथील येड्डा या भागात अनेक कार्यक्रम करण्यासाठी कला व संस्कृती खात्याने २६ लाख ८५ हजार रुपयांचे अनुदान दिल्याचा तवडकर यांचा आरोप आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काणकोण मतदारसंघात मंत्री त्यांच्या विरोधातच वावरत आहेत.

त्यासाठी हा निधी देण्यात आला होता. विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपताच तवडकर यांनी थेट गावडे यांच्यावर शरसंधान साधले. विशेष अनुदानातून गावडे यांनी राज्यभरात कोणत्या मतदारसंघात किती अनुदान दिले, याची माहिती कला व संस्कृती संचालनालयातून मागवून सभापतींच्या अधिकारांची जाणीव त्यांनी गावडे यांना करून दिली.

Govind Gaude
Goa Entertainment: गोव्यातील ‘नोमोझो’ म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच!

तवडकर यांनी एकाच घरात स्थापन केलेल्या दोन दोन संस्थांना अशा स्वरूपाचे अनुदान दिल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मला याची माहिती होती; पण आता स्थानिकांनी निवेदन देताना कला व संस्कृती खात्याने त्यांना पुरवलेली माहितीच दिल्याने याला दुजोरा मिळाला आहे.

माझ्या मतदारसंघात मंत्र्यांचा एकाच गावातील एका प्रभागात विशेष अनुदान देण्याचा हेतू संशयास्पद आहे. आमच्याच सरकारमधील एक मंत्री माझ्याविरोधात असा वागू शकतो, याचा मला धक्का बसला असून त्याचा खेद वाटतो. मंत्री अशा बेफिकीरीने वागतात, आपल्याच वरिष्ठांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, ही दुर्दैवी गोष्ट आहे, अशी खंत सभापतींनी व्यक्त केली.

कोणत्याही चौकशीस तयार : गावडे

यावर मंत्री गावडे यांनी आपण कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. ते म्‍हणाले, विशेष अनुदान हे कलाकारांना कार्यक्रम करण्यासाठी दिले जाते. कार्यक्रमावर खर्च झाल्‍याचे सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. कार्यक्रम न झाल्यास संस्थेला व्याजासह पैसे परत करावे लागतात. मी संबंधित असलेल्या संस्थेलाही असे पैसे परत करावे लागले होते.

मंत्र्यांच्या हेतूची चौकशी व्हायला हवी : रमेश तवडकर

सभापती रमेश तवडकर म्हणाले की, भर पावसाळ्यात हे कार्यक्रम झालेले नाहीत. त्या कार्यक्रमांचे मला सोडाच, स्थानिक सरपंच किंवा पंचांनाही निमंत्रण नव्हते. असे हे विशेष अनुदान मंत्र्यांच्या परवानगीशिवाय मिळणे शक्यच नाही. कारण पाच लाख रुपयांपर्यंत अशी मंजुरी देण्याचे त्यांनाच अधिकार आहेत. याला मी घोटाळा आजच्या घडीला म्हणत नाही; पण मंत्र्यांच्या हेतूची चौकशी झाली पाहिजे. सरकारचे पैसे हे जनतेचे पैसे असतात. त्याच्या वाटपाला काहीतरी मापदंड असावा लागतो. त्याचे उल्लंघन झाले आहे, असा शेरा सभापतींनी मारला.

मंत्र्यांनी पद सोडावे : विजय सरदेसाई

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, की सभापतींचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे कारवाई अपरिहार्य आहे. सरकारने त्वरित या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. खुद्द सभापतींनीच घृणास्पद टिप्पणी केल्याने मंत्र्यांनी पद सोडावे आणि चौकशीला सामोरे जावे, अशी माझी मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com