Durganand Nadkarni Dainik Gomantak
गोवा

गोवा, कोकण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाया घालणाऱ्या दुर्गानंद नाडकर्णी यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी अर्पण केली श्रद्धांजली

मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. अंत्यसंस्कार शनिवारी सायंकाळी होनराव यांच्या औसा येथील फार्मवर करण्यात आले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राजकारण, धर्मकारण, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत आज गोमंतकात आघाडीवर व नेतृत्वस्थानी असलेल्या ज्येष्ठ संघ कार्यकर्त्यांची एक पिढी आपल्या ध्येयनिष्ठ, विचारनिष्ठ जीवनाच्या उदाहरणातून घडविणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक दुर्गानंद वासुदेव नाडकर्णी यांचे शनिवारी (२० डिसेंबर) लातूर येथील त्यांचे शिष्योत्तम उमाकांत होनराव यांच्या घरी निधन झाले.

मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. अंत्यसंस्कार शनिवारी सायंकाळी होनराव यांच्या औसा येथील फार्मवर करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाडकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

"गोवा व कोकण प्रांतात संघकार्याचा पाया घालणारे, निष्ठावंत राष्ट्रसेवक श्री दुर्गानंद वासुदेव नाडकर्णी उपाख्य दुर्गानंदगिरी स्वामीजी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. त्यांचे व्रतस्थ, त्यागमय जीवन आणि कार्य आणि असंख्य स्वयंसेवकांसाठी प्रेरणादायक होते. ईश्वर त्यांचे कुटुंबीय तसेच शिष्यवृंदाला हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य प्रदान करो", अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी श्रद्धांजली दिली आहे.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, रा.स्व. संघाचे माजी गोवा संघचालक तथा 'भारतमाता की जय' संघाचे संस्थापक संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, प्राचार्य रत्नाकर लेले, शिक्षणतज्ज्ञ दिलीप बेतकेकर, विहिंपचे स्व. सुधीर देसाई, 'मातृछाया'चे दिलीप देसाई, डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेचे सुभाष देसाई आदी कार्यकर्त्यांना त्यांनी संघशिस्तीचे धडे दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT