Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 63.59 टक्के मतदान

Goa ZP Election 2025 Voting Turnout: यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या जि.पं. निवडणुकीत एकूण ५६.८६ टक्के मतदान झाले होते.
Goa ZP Election 2025 | Total Voting Turnout
Goa CM ZP Election VotingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह काँग्रेस, 'आप'च्या दिग्गज नेत्यांनी प्रचारात उतरून प्रतिष्ठेची बनवलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ६३.५९ टक्के मतदान झाले. केरी-सत्तरीत सर्वाधिक ८२.६४%, तर नावेलीत सर्वात कमी ४९.२० टक्के मतदान झाले.

यापूर्वी २०२० मध्ये झालेल्या जि.पं. निवडणुकीत एकूण ५६.८६ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी वाढल्याने मतदारांनी कोणत्या पक्षाला कौल दिला आहे, हे सोमवारीच निकालानंतर समोर येणार आहे.

यंदा जि.पं. निवडणूक रिंगणात २२६ उमेदवार होते. सत्ताधारी भाजपने मगोपसोबत, तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने गोवा फॉरवर्डसोबत युती करून निवडणूक लढविली आहे.

Goa ZP Election 2025 | Total Voting Turnout
Dodamarg Accident: पुढच्या सीटसाठी चिमुरडीनं हट्ट केला अन्... गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या कारचा दोडामार्गात भीषण अपघात

मुख्यमंत्री, राणेंच्या मतदारसंघांत सर्वाधिक मतदान

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी आणि मंत्री विश्वजीत राणे यांच्या वाळपई मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. हे दोन्ही नेते गेल्या काही दिवसांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले होते.

एकाच क्रमांकावर दोनदा मतदान

कुर्टी जिल्हा पंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. १२ मध्ये एकाच मतदार क्रमांकावर दोनवेळा मतदान झाल्याचा दावा एका मतदाराने केला आहे. कुर्टी येथील काँग्रेस कार्यकर्ते दिलीप भामईकर यांनी यासंबंधी तक्रार केली.

मी मतदान करण्यासाठी आलो, त्यावेळी माझ्या ६८५ मतदार क्रमांकावर भलत्याच कुणी मतदान करून गेल्याचे लक्षात आले. मी यासंबंधी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर मला पोस्टल मतदान करण्यासाठी स्लीप देण्यात आली. हे काय चालले आहे, असा प्रश्नही भामईकर यांनी केला

साळ येथील मतदान केंद्रावर गोंधळ

साळ येथे मतदान केंद्राजवळ एका उमेदवाराच्या वावरामुळे सकाळी काहीसा गोंधळ निर्माण झाला. संबंधित उमेदवार एका मतदान केंद्राजवळच घुटमळत होता. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

अखेर पोलिसांनी संबंधित उमेद‌वाराला तसेच मतदान केंद्रापासून काही अंतरावर जमलेल्या कार्यकर्त्यांना दूर केले साळ येथे वाद निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. तसेच आरबीआय पोलिसांची तुकडीही तैनात केली होती

Goa ZP Election 2025 | Total Voting Turnout
Hard Decision! विश्वचषक संघातून शुभमन गिलला डच्चू का? कॅप्टन सूर्याने सांगितलं संघ निवडीमागचं 'ते' मुख्य कारण

मुख्यमंत्र्यांच्या मुलीने केले पहिल्यांदा मतदान

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोठंबी-पाळी मतदान केंद्रावर कुटुंबीयांसह मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सुलक्षणा, वडील पांडुरंग सावंत आणि कन्या पार्थिवी होती. पार्थिवी हिने यंदा पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला

सतीश धोंड यांनीही बजावला मतदानाचा हक्क

भाजपचे पश्चिम बंगालचे संघटनमंत्री सतीश धोंड यांनी शनिवारी सकाळी कोलकात्यातून गोव्यात दाखल होऊन पीर्ण येथे जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान केले आणि त्यानंतर तत्काळ ते आपल्या कामाच्या ठिकाणी निघून गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com