Goa Swimming Pool: Dainik Gomantak
गोवा

Goa Swimming Pool: सडा जलतरण तलावात परप्रांतीय युवकांची हुल्लडबाजी

Goa Swimming Pool: अधिकारी संतप्त : क्रीडा संचालनालयाची पोलिसांत तक्रार

दैनिक गोमन्तक

Goa Swimming Pool: मुरगाव सडा येथील राज्य क्रीडा व युवा व्यवहार संचालनालयाच्या जलतरण तलावात काही परप्रांतीय युवक येऊन मनमानी करून आंघोळ करीत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

जलतरण तलावासमोरच असलेल्या गोवा पुनवर्सन मंडळाच्या वसाहतीतील काही युवक, राजकीय दबाव वापरून जलतरण तलावात येऊन आंघोळ करीत असल्याचे संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात येत आहे.तसेच पुढील महिन्यात गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी, सडा येथील राज्य सरकारच्या जलतरण तलावाची पाहणी करण्यासाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे अधिकारी आले होते, असे संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

चिखली ‘साग’, टिळक मैदानची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मुरगाव तालुक्यातील दाबोळी चिखली साग मैदानावरील इनडोअर स्टेडियमवर स्क्वॅश, बॅटमिंटन व वास्को येथील टिळक मैदान फुटबॉल स्पर्धेसाठी निवडण्यात आल्याची माहिती ‘साग’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

तलाव परिसरात पोलिसांची अहोरात्र गस्त

पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन जलतरण तलावाकडे अहोरात्र गस्त वाढविली आहे. तसेच तलावाच्या क्षेत्रातील घरांलगत मोठी झाडे येत असून संबंधितांनी त्या झाडांच्या फांद्या कापाव्यात, अशी मागणी संचालनालयातर्फे करण्यात आली आहे. तसेच जलतरण तलावाच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली आहे. ऑक्टोबर २५ पासून राज्यात '' राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा '' होणार आहे. बेंगळुरू येथील अधिकाऱ्यांनी जलतरण तलावाची पाहणी केली होती.कदाचित सडा जलतरण तलावाचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी उपयोग केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT